लांजावासियांचा दसरा झाला गोड!!! *लांजा शहराचा पाणी प्रश्न लागला मार्गी..*
लांजावासियांचा दसरा झाला गोड!!!
*लांजा शहराचा पाणी प्रश्न लागला मार्गी..*
*राज्याचे मुख्यंत्रीपद एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आणि सिंधुरत्न समितीचे किरण सामंत यांच्या प्रयत्नामुळे आले मोठे यश.*
*नगरोत्थान महाभियानांतर्गत लांजा नळपाणी योजनेच्या कामाला ६६.७० कोटी रुपये मंजूर*
*दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधूरत्नचे सदस्य किरण सामंत यांनी दिली लांजा वासियांना भेट*
*लांजा शहराच्या नळपाणी योजनेसाठी ६६.७० कोटीला मंजुरी*
*लांजा*---
लांजा शहराचा आत्यावश्यक असलेला पाणी प्रश्न आज दसरा निमित्त मार्गी लागला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून लांजावासीयांना भेट दिली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून या योजनेचा पाठपुरावा संदर्भात सिंधूरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी केला असून त्यांनी केलेल्या पाठपुरावाला आज दसरा निमित्त यश आले आहे.
गेल्या अनेक वर्ष असलेला हा प्रश्न किरण सामंत यांच्यामुळे मार्गी लागला आहे. त्यामुळे लांजा वासीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.
लांजा शहरातील पाणी प्रश्न बिकट झाला असताना त्यासाठी नगरोउत्थान महा अभियान अंतर्गत लांजा नगरपंचायतीचा पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांच्या मान्यतेचा नगरपरिषद प्रशासन संचालना यास सादर केलेला होता. नगरपरिषद प्रशासन संचालनाचे ध्येय तांत्रिक मान्यता शुल्क प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क यांचा समावेश करून रुपये 66.70 कोटी किमतीच्या प्रस्तावाला आज शासनाने मान्यता दिली आहे.
या पाणी प्रश्नाची फाईल कित्येक दिवस प्रलंबित होते मात्र हा विषय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत किरण सामंत यांनी पोहोचल्यानंतर या विषयाला गती मिळाली.
आणि आज योगायोग म्हणावा लागेल की दसऱ्यासारख्या मोठ्या सणा निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून लांजावासी यांना पाणी प्रश्न मार्गी लागल्या असण्याची सुखद बातमी आज कानावर आली.
आणि त्याच्या कामासाठी 66.70 कोटी रुपयाला मंजुरी मिळायचे पत्र ही प्राप्त झाले आहे. महायुतीच्या माध्यमातून मिळालेले यशाबद्दल किरण सामंत यांचे लांजावासी यांनी मनापासून आभार मानले आहेत.
त्यामध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप,नगराध्यक्ष मनोहर बाईत,सचिन डोंगरकर ,प्रसाद भाई शेटे, अनंत साळवी,बाबाशेठ चव्हाण, शेखर भिंगार्डे, बाबा भिंगार्डे, रईस सय्यद, समीर सावंत हे उपस्थित होते.
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी
फॉलो
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment