*राज्यात विधानसभा निवडणुकीआधी लोकार्पण आणि भूमिपूजनाचा धडाका*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*राज्यात विधानसभा निवडणुकीआधी लोकार्पण आणि भूमिपूजनाचा धडाका* 

मुंबई:--पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी दोघेही आज महाराष्ट्रात होते. पोहरादेवीतून मोदींच्या निशाण्यावर अधिक वेळ काँग्रेसचं राहिली.

   तर कोल्हापुरातून संविधान आणि जनगणनेवरुन राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रात आले. मोदीपोहरादेवीतून काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर तुटून पडले तर राहुल गांधींनी कोल्हापुरातून भाजपवर निशाणा साधला.*

  बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नंगारा संग्रहालयाचं अनावरण झालं.

 मोदींनी यावेळी नगाराही वाजवला. बंजारा समाजाच्या वतीनं परंपरागत नृत्यानं मोदींचं स्वागत झालं. जगदंबा देवीची आरतीही मोदींनी केली तर, राहुल गांधींच्या हस्ते कसबा बावड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं.

  मोदी पोहरादेवीत होते, त्यामुळं बंजारा समाजावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाला काँग्रेसनंच मुख्य प्रवाहापासून दूर ठेवल्याचा आरोप केला. तर सरकारी मोठ्या संस्थांमध्ये भाजपकडून संघाच्याच माणसांची भरती होते. दलित, आदिवासी आणि ओबीसी दिसत नाही, असा पलटवार राहुल गांधींनी केला.*

पोहरादेवीत मोदींच्या हस्ते, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचंही वितरण झालं. मात्र मोदींच्या भाषणात अधिक वेळ काँग्रेसच निशाण्यावर राहिली. 

  काँग्रेसला शहरी नक्षली चालवत असल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला आहे. इकडे उद्धव ठाकरेंनीही मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंवर शाब्दिक तोफ डागली. निवडणुकीआधी कितीही फिती कापा, निवडणुकीत भाजप आणि गद्दारांना जागा दाखवणार असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा 8 दिवसांत होण्याची शक्यता आहे. 

 त्याआधी लोकार्पण आणि भूमिपूजनाचा धडाका पाहायला मिळतोय. मग पोहरादेवीतील नगारा संग्राहलयासह किसान सन्मान निधीचं वितरण असो की ठाण्यात, मुंबईतील मेट्रो 3च्या पहिल्या फेजच्या शुभारंभासह ठाणे रिंग मेट्रोचं भूमीपूजन. आणि त्याच निमित्तानं प्रचाराचाही नारळ फुटलेलाच आहे.*

मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments