रत्नागिरी शहरातील माळनाका थिबा पॉइंट रोड कडून राजेंद्र नगरकडे जात असताना पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेट जवळ रस्त्या शेजारी टर्की (ब्राऊन हेरॉईन) सदृश अंमली पदार्थ बाळगणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, एकूण ५०३५०₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी शहरातील माळनाका थिबा पॉइंट रोड वरून राजेंद्र नगर कडे जात असताना पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेट जवळ रस्त्या शेजारी उद्यमनगर ओसवाल नगर रोड येथील मतीन महामूद शेख (३१) हा इसम टर्की (ब्राऊन हेरॉईन) सदृश अंमली पदार्थ व इतर साहित्य गैरकायदा आपल्या ताबे कब्जात बाळगल्या स्थितीत आढळून आला. यासंदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली आहे. यासंदर्भात रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३७७/२०२४ मध्ये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम एन. डी. पी. एस. ॲक्ट १९८५चे कलम ८(क), २१ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
यामध्ये १) १०८५०/- एक पारदर्शक प्लास्टिक पाउच त्यामध्ये टर्की (ब्राऊन हेरॉईन) सदृश अमली पदार्थ असून त्याचे प्लास्टिक पिशवी सह वजन २.०० ग्रॅम असून, एकूण ३१ पुड्या त्याचे एका पुडीची किंमत ३५० रुपये, याप्रमाणे एकूण किंमत. २) ३१ लहान कागदाचे तुकडे टर्की पाऊडर/ ब्राऊन हेरॉईनच्या पुड्या बांधण्यासाठी वापरण्यात आलेले. ३) एक प्लास्टिकचा पाउच जुना वापरता, तसेच सदर इसमाच्या पँटच्या उजव्या खिशामध्ये एक लायटर, एक सिगारेट, व एक मोबाईल हँडसेट, ४) ४,५००₹ किमतीचा एक काळया रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट, जियो कंपनीचे सिमकार्ड, ५) cavanders gold या कंपनीची एक पूर्ण सिगारेट व एक अर्थावत जळलेले सिगारेट. ६) एक निळ्या रंगाचे लायटर, जुने, वापरते. ७) ३५,०००₹ किमतीची एक काळया रंगाची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल किंमत सुमारे असा एकूण सुमारे ५०३५०₹ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर घटना दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. सदर गुन्हा दिनांक ५ ऑक्टोबर रोजी नोंद करण्यात आला. सदर घटनेची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश प्रकाश नार्वेकर यांनी दिली आहे. 

Comments