* ठाणे-कर्नाटक व्हाया सावर्डे थेट इसीसकडे पैसा पुरवला जात असल्याचा संशय* *चिपळूण सावर्डे येथून सहा जणांच्या मुसक्या आवळल्या*!!

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*


 ठाणे-कर्नाटक व्हाया सावर्डे थेट इसीसकडे पैसा पुरवला जात असल्याचा संशय

चिपळूण सावर्डे येथून सहा जणांच्या मुसक्या आवळल्या*!!

*एटीएस ची मोठी कारवाई ,14 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी*

रत्नागिरी---कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे नवी मुंबईच्या एटीएस (दहशतवाद विरोधी) पथकाने मोठी कारवाई केली आहे. इसिस या अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याच्या मोठ्या खळबळजनक आरोपाखाली सावर्डेतून एकूण सहा जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून दहशतवाद विरोधी पथकाकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

    कर्नाटकातून चोरट्या पद्धतीने दहा लाख रुपयांचे खैराचे लाकूड आणून ते सावर्डे येथील एका ठिकाणी बेकायदेशीर रित्या साठवून ठेवल्या प्रकरणी सावर्डे, चिपळूण येथील मुआज रियाज पाटणकर याच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नवीमुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाने केली आहे. 

  खैर लाकडाच्या बेकायदेशीर व्यापार करून यातील पैसा दहशतवादी कृत्यासाठी वापरला जात असल्याचा संशय दहशतवाद विरोधी पथकाला आहे. 

  अटक करण्यात आलेल्या या संशयित सहा आरोपींची रवानगी चिपळूण न्यायालयाने 14 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. 

   नवी मुंबई दहशतवाद विरोधी पथक तसेच चिपळूण सावर्डे पोलीस व वनविभाग यांच्या सहकार्याने एकूण पाच टीम करून ही मोठी कारवाई कोकणात नवरात्रोउत्सवातच करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

  शांत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील या प्रकरणात दहशतवादी कनेक्शन काय ? हे पुढील तपासात अधिक स्पष्ट होणार आहे.

खैर तोडीचे कर्नाटक कनेक्शन*

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत. 1) वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन, रा.78, इस्लामपूरा मशीदजवळ भिवंडी महानगर पालिकेच्या पाठीमागे, ता. भिवंडी, जि. ठाणे 2) असिफ रशिद शेख, रा. नगरसुल, ता. जि. नाशिक 3) फारुख शेरखान पठाण, रा. रेव्हेन्यु कॉलनी, येवला रोड, नाशिक 4) शाहनवाज प्यारेजन, रा.एन.एन.टी. रोड, चिंतामणी टाउन, चिकबल्लापूर, कर्नाटक 5) इरशाद शेख, रा. संगमनेर, अहमदनगर, 6) मुआज रियाज पाटणकर, रा. 1842, अडरेकर मोहल्ला, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांनी आपसात संगनमत रचून व फौजदारी पात्र कट करुन कर्नाटक राज्यातून बेकायदेशीरपणे चोरुन आणलेले "खैर झाडाचे" लाकडाचा मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठा मुआज रियाज पाटणकर याने सावर्डे, ता. चिपळूण येथे खाजगी मालकीची गट नं. 3476, ता भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत लपविलेला असल्याची मोठी गोपनिय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. 

   संशयीतांकडे केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने पुढील ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

असा आहे "इसिस" कनेक्शन*

  अटक करण्यात आलेल्या सहा संशयित आरोपींपैकी वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन हा "इसिस" संबंधातील रतलाम, मध्यप्रदेश येथील "अल् सुफा मॉडयुल" मधील जुलै-2023 मध्ये अटकेत असलेला आरोपी आकिफ नाचण, रा. बोरीवली, पडघा, जि. ठाणे याचेशी जवळीक असलेला आहे. 

  यांतील संशयीत इसम वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन चोरून  लाकडांची खरेदी विक्री वाहतुक व साठा करून  पैसे कमवून त्यातील काही रक्कम तो देशविघातक कृत्ये विरोधात काम करणारे काही धार्मिक कट्टरवादी इसम व संशयीत संघटनांना देत आहे." असा मोठा संशय या आरोपीवर आहे. यावरून ही  दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे.

  याप्रकरणी  24 टन वजनाचा. दहा लाख आठ हजार रुपये किमतीचा खैर झाडाचा लाकडाचा साठा बेकायदेशीर साठवून ठेवल्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 प्रमाणे 303(1),317,112,3 (5), 61, तसेच भारतीय वन अधिनियम 1927 26(1) (ई) (एफ),41(1) (2) (बी) डी) (ई),42,52,55, 61 (ए), 65 (डी),69,77 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

   दरम्यान या सगळ्या संशयित आरोपींचा तपास सुरू असून आणखी काय कनेक्शन आहे या सगळ्याची तपास दहशतवाद विरोधी पथक घेत आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रवीण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटच्या प्रतिभा शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

  रत्नागिरी जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वैशाली गायकवाड व चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

  दरम्यान या सगळ्या संशयित आरोपींचा तपास सुरू असून आणखी काय कनेक्शन आहे या सगळ्याची तपास दहशतवाद विरोधी पथक घेत आहे.

   त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आणखी कोणती मोठी माहिती समोर येथे हे पहावे लागणार आहे. खैरतोडीचा आर्थिक व्यवहार  व्यवहार कशाप्रकारे चालतो.

  या सगळ्यातून  आर्थिक व्यवहाराचा उपयोग दहशतवादी कनेक्शन वापरून देश विघातक कृत्यासाठी कशाप्रकारे केला जात होता या सगळ्याचा तपास रत्नागिरी पोलीस व नवी मुंबई येथील दहशतवाद विरोधी पोलीस पथक करीत आहे.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments