रत्नागिरी जिल्ह्यातील लाकूड व्यापाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा, झाड तोडी संदर्भात पन्नास हजार रुपये दंडाची रक्कम केल्याने शेतकऱ्यांवर होणार अन्याय

शासनाने झाड तोडी संदर्भात दंडाची रक्कम सरसकट पन्नास हजार रुपये एवढी वाढविल्याने जिल्ह्यातील लाकूड व्यापारी, शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. राज्यातील महायुती सरकारने जो हा निर्णय घेतला त्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज मोर्चा काढला. रत्नागिरीतील माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी होऊन हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा पन्नास हजार रुपयांची दंडाची रक्कमेची अट शासनाने तात्काळ शिथिल करावी. अन्यथा राज्यस्तरीय आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराच यावेळी शेतकऱ्यांनी दिला. संघटनेचे अध्यक्ष श्री पालांडे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य असा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना कवळ तोडण्यासाठी, सरपण म्हणून , शेतीच्या सगळ्याच कामासाठी झाड तोडीसाठी आता परवानगी काढावी लागणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील स्थानिक आमदार, सत्ताधारी आणि विरोधक यांनी कुठे लाकुड व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. आम्ही या नियमानुसार आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला उडवा उडविची उत्तरे देण्यात आली. आगामी काळात जिल्ह्यातील शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा श्री पालांडे यांनी यावेळी दिला. 

Comments