मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे विपुल (दादा) कदम यांच्या गुहागर दौ-याने शिवसेनेत जल्लोष..!

शृंगारतळी येथे जेष्ठ शिवसैनिक आत्माराम शिंदे यांचे हस्ते शिवसेना कार्यालयाचे जल्लोषात उदघाटन संपन्न..!

आबलोली (संदेश कदम) 
गुहागर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे विपूल (दादा) कदम यांनी नुकताच गुहागर तालुक्याचा दौरा केला आणि शिवसेना पक्षात एकच जल्लोष साजरा करण्यात आला जेष्ठ आणि युवा,महिला - पुरुष कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये विपुल (दादा) कदम यांच्या गुहागर दौ-याने अंगात उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले त्याचे कारण होते की, गुहागर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या आणि तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शृंगारतळी येथे विपुल (दादा) कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ आणि श्रेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे यांच्या शुभहस्ते शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचे मोठ्या जल्लोषात उदघाटन झाले आणि शिवसैनिकांनी जय भवानी,जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज की जय..! हिंदु हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, धर्मविर स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांचा विजय असो..! अशा गगनभेदी घोषणा शिवसैनिकांनी दिल्या आणि फटाक्यांची आतिषबाजी करुन शृंगारतळी बाजारपेठेत एकच जल्लोष झाला. सर्व सामान्य शिवसैनिकांची आणि जनतेची विकास कामे करण्यासाठी आणि अडी - अडचणी सोडविण्यासाठी शृंगारतळी येथे जेष्ठ आणि श्रेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे यांचे शुभहस्ते शिवसेनेची शाखा उघडली असल्याचे तरुण तडफदार शिवसेनेचे युवा नेतृत्व विपुल (दादा) कदम यांनी जाहीर केले आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करुन धन्यवाद दिले. 
                 यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन दीपप्रज्वलन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे तालुका सचिव संतोष आग्रे यांनी केले तर शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक कनगुटकर यांनीहि यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने विपुल (दादा) कदम आणि उपस्थित शिवसैनिकांचा शाल, श्रीफळ आणि भुफे देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी विपुल (दादा) कदम, जेष्ठ आणि श्रेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे,शिवसेना पक्षाचे पक्षाचे पक्ष निरिक्षक अनुराग उतेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक कनगुटकर, तालुका सचिव संतोष आग्रे, अमरदिप परचुरे, रोहन भोसले, निलेश मोरे, महेश तावडे, बबलू आग्रे, राजेंद्र उर्फ राजा साळवी, सागर काजरोळकर, सरपंच प्रकाश भोजने, काशिनाथ भोजने यांचेसह शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते महिला - पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments