भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर;

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर;

*९९ जणांचा समावेश;* 

*पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी* 

मुंबई:---- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ९९ जणांची नावं आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपनं १६४ जागा लढवत १०५ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजप १५० ते १६० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. 

  पहिल्या यादीत ९९ जणांचा समावेश आहे. या यादीत पहिली दोन नावं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आहेत. 

  फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम आणि बावनकुळेंना कामठीतून उमेदवारी देण्यात आलेली आहे.

  दरम्यान भाजपच्या पहिल्या यादीमध्ये पूर्वीच्या दोन आमदारांचं तिकिट कापण्यात आलं आहे. कामठी मतदारसंघामध्ये भाजपचे टेकचंद सावरकर हे आमदार होते. 

  मात्र यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्याजागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदार संघातून अश्विनी जगताप यांच्याऐवजी भाजपकडून शकंर जगताप हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.*

  भाजपकडून विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कन्म्बसी फॅक्टरचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी मुंबईत भाकरी फिरवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, उमेदवारी यादीवर नजर टाकल्यास भाजपने जुन्या आमदारांवर पुन्हा विश्वास दाखवल्याचे दिसत आहे.

  लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या मिहीर कोटेचा यांना मुलुंडमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर राम कदम यांना घाटकोपर पश्चिम आणि तमिल सेल्वन यांना धारावीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.*

   या दोघांचे तिकीट खराब कामगिरीमुळे कापले जाईल, अशी चर्चा होती. 

  मात्र, राम कदम यांनी गेल्या काही वर्षांमध्ये काशी यात्रा, अयोध्या यात्रांचा जो सपाटा लावला होता, त्याचा त्यांना जनसंपर्काच्यादृष्टीने फायदा झाला आणि त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी मिळाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. याशिवाय, आशिष शेलार (वांद्रे पश्चिम ) आणि त्यांचे बंधू विनोद शेलार (मालाड पश्चिम) या दोन्ही बंधूंना भाजपने उमेदवारी दिली आहे.*

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या