डोंबिवली विधानसभा मतदार संघातून मराठा समाजाच्या वतीने गणेश कदम निवडणूकीच्या रिंगणात..!

आबलोली (संदेश कदम) 
 विधानसभेच्या उमेदवारीसाठी राज्यातील सर्व इच्छुकांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुलाखती दिल्या आहेत. यात डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून गुहागर तालुक्यातील काताळे गावचे सुपुत्र गणेश कदम यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश जरांगें पाटील यांनी दिल्याने डोंबिवलीकरांना एक तरुण व आक्रमक चेहरा आमदार म्हणून निवडण्याची संधी मिळाली आहे.

रोखठोक आणि प्रेमळ व्यक्तीमत्व अशी गणेश कदम यांची ओळख असून समाजाच्या अनेक आंदोलनं, उपक्रम यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

अनेक आंदोलनं, उपोषणं करूनही मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नसतील तर लोकशाही मार्गाने विधानसभेत जाऊन आवाज उठवने गरजेचे असल्याने निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगतले.

टिप्पण्या

news.mangocity.org