*दृष्टीहीन अजय, सागरचे रेस अक्रॉस इंडिया सायकल स्पर्धेत दिव्य यश*


*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

 *दृष्टीहीन अजय, सागरचे रेस अक्रॉस इंडिया सायकल स्पर्धेत दिव्य यश*

 काश्मिर ते कन्याकुमारी ३७५८ किमी अंतर सायकलने ९ दिवसात पूर्ण loo 9


 दृष्टीहीन दिव्यांग सागर बोडके नाशिक आणि अजय लालवानी मुंबई या दोघांनी रेस ॲक्रॉस इंडिया सायकल स्पर्धेत सहभागी होऊन चार पायलट रायडर्स उल्हास कुलकर्णी नाशिक, अंबरीश गुरव दापोली, सुशील सारंगधर मुंबई, शिवम खरात मुंबई यांच्यासोबत रीले पद्धतीने टँडम सायकल चालवत श्रीनगर काश्मिर ते कन्याकुमारी ३७५८ किमीची सायकल राईड ९ दिवस १२ तास ४ मिनिटे या वेळात पूर्ण करुन एक नवा जागतिक विक्रम रचला आहे. याची दखल ब्रावो बुक ऑफ इंटरनॅशनल अवॉर्ड यांनी देखील घेतली आहे.

पायलट रायडर दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, टँडम सायकलवर दोघेजण बसू शकतात. यावर पुढे पायलट रायडर बसतो त्याच्याकडे हँडल, गिअर, ब्रेक असे पूर्ण सायकलचे नियंत्रण असते. मागील सीटवर दिव्यांग दृष्टीहीन स्टोकर बसतो. या दोघांनाही समन्वय साधत पायंडल मारावे लागतात. आंतरराष्ट्रीय दर्जाची आशियातील सर्वात लांब अंतराची रेस अक्रॉस इंडिया ही स्पर्धा १० ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीनगरहुन सुरु झाली. या स्पर्धेत पहिल्यांदाच टँडम सायकल चालवत दिव्यांग अजय सागरची टीम, रेस टू व्हिजन नावाने सहभागी झाली होती. स्पर्धकांवर जीपीएस प्रणालीद्वारे लक्ष ठेवले जाते. दिवस रात्र, ऊन, पाऊस, थंडी, रस्त्यावरील चढ उतार, रहदारी, रस्ता दुरुस्तीची कामे, सायकल बिघाड इत्यादी विविध अडचणींवर मात करत सहकाऱ्यांच्या मदतीने, शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावणारी खडतर अशी ही आव्हानात्मक अल्ट्रासायकलिंग स्पर्धा यशस्वीपणे विक्रमी वेळात पूर्ण झाली. यासाठी सर्वांनी खूप सराव केला होता.

टीम रेस टू व्हिजन सहकारी संकेत भानोसे, डॉ अनिल बारकुल, रामेश्वर चव्हाण, सतिश जाधव, लखन लालवानी, महेश दाभोळकर, संतोष संसारे, गिरीश, अमितकुमार इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेसाठी हॅपी ह्युमन्स फाउंडेशन, बीडचे बारकुल हॉस्पिटलचे डॉ अनिल, निओ रोटरी क्लब मुंबई, ठाणे रोटरी क्लब, समर्थ व्यायाम मंदिर दादर, नासिक सायकलिस्ट, सक्षम नाशिक, गरुडझेप संस्थांचे डॉ संदीप भानोसे, नॅब युनिट महाराष्ट्र, आरसीई एज्युकेशन, आईशा फाऊंडेशन, ब्लाइंड वेल्फेअर, मानवधन, दापोली सायकलिंग क्लब, बींईगअप फाऊंडेशनचे भूषण संसारे इत्यादी संस्थांचा मदतीचा हात मिळाला. दृष्टीहीन दिव्यांग सागर आणि अजय यांची ही श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल राईड नक्कीच कौतुकास्पद आणि अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org