आबलोली येथे दुर्गा देवीची स्थापना दि.७ रोजी श्री. सत्यनारायणाची महापूजा, दि. ९ रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा आणि दस-याला भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन..!
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या भव्य पटांगणात श्री. दुर्गा देवीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली असून आबलोली येथील सुप्रसिद्ध विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे अध्यक्ष श्री. कृष्णकांत रेपाळ, उपाध्यक्ष रविंद्र रेपाळ, सचिव अजित रेपाळ, खजिनदार प्रशांत नेटके यांच्या अधिपत्याखाली आबलोलीत नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून तरुणाईच्या आनंदाला उधाण आले असून दांडिया रासवर तरुणाईची पावले थीरकत असून सर्वत्र उत्साही वातावरण आहे. सोमवार दिनांक ७/१०/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून श्री. विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली यांचे वतीने श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तसेच बुधवार दिनांक ९/१०/२०२४ रोजी विनामुल्य भव्य दिव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या रेकॉर्ड डान्स स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांकासाठी २५००/- रुपये, व्दितीय क्रमांकासाठी १५००/- रुपये, तृतीय क्रमांकासाठी १०००/- रुपये तसेच लहान गट प्रथम क्रमांकासाठी १५००/- रुपये, व्दितीय क्रमांकासाठी १०००/- , तृतीय क्रमांकासाठी ५००/- रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून दुस-याच्या निमित्ताने भव्य दिव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत
या मंडळाचे सदस्य श्री. नरेश निमूणकर, प्रथमेश निमूणकर, नितेश ऊर्फ भैय्या निमूणकर, अक्षय निमूणकर, पिंटू निमूणकर, विशाल नेटके, वैभव नेटके, अतिष रेपाळ, योगेश रेपाळ, स्वप्नील रेपाळ, सागर रेपाळ,साहिल रेपाळ, ऋषीकेश बाईत, सत्यम गुरसळे, धुनराज गुरसळे, सुरज दिंडे, शैलेश दिंडे, विशाल लोकरे, शरद उकार्डे, सुरज रेडेकर, शरद लांडे, राजेश तोडकरी, गणेश महाडिक, आदी. नवरात्रोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत
आबलोली येथील नवसाला पावणारी श्री. दुर्गा देवी या दुर्गा देवीची भव्य दिव्य आकर्षक मुर्ती साहिल अनिल रेपाळ यांनी दिली आहे. गेली १६ वर्ष हे मंडळ नवरात्रोत्सवात सामाजिक उपक्रम राबवितात यामध्ये नेत्रदान, नेत्र तपासणी शिबीर, आरोग्य शिबीर, महिला व विद्यार्थांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा तसेच तालुक्यातील नामांकित महिला मंडळ व पुरुष मंडळी यांचे सुमधुर भजनाचे कार्यक्रम तसेच विनामूल्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते हा संपूर्ण कार्यक्रम भक्ती भावाने उत्साहात आणि शांततेत पार पडतो. या संपूर्ण कार्यक्रमात आबलोली गावातील व आबलोली पंचक्रोशीतील जनता बहुसंख्येने सहभागी होते.
Comments
Post a Comment