भारती शिपयार्ड अधिकारी, कर्मचाऱ्यांची १०वर्षांपूर्वीची देणी ना.उदय सामंतांच्या प्रयत्नाने मिळाली

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

भारती शिपयार्ड अधिकारी, कर्मचाऱ्यांची १०
वर्षांपूर्वीची  देणी ना.उदय सामंतांच्या प्रयत्नाने मिळाली          

रत्नागिरी :--- मिऱ्या येथील बंद पडलेल्या भारती शिपयार्ड कंपनीतील अधिकारी, कर्मचारी  यांना ना.उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नामुळे वेतनासह उर्वरित शिल्लक रक्कम मिळाली आहे.   कंपनी बंद पडल्यापासून गेली 10 वर्षे अडकलेली रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांचे वाटप 195 कर्मचाऱ्यांना करण्यात आले. 

  रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथे अनेक वर्षे सुरू असलेली भारती शिपयार्ड कंपनी सुमारे दहा वर्षांपूर्वी बंद पडली. त्यावेळी कंपनीत कायमस्वरूपी असलेल्या अधिकारी, कर्मचारी, मॅनेजर यांची देय रक्कम कंपनी देण होती. त्यामुळे करोडो रुपयांची देणी कंपनीकडे अडकली होती.

   तर ठेकेदारांचीही कोट्यावधींची बिले कंपनीकडे प्रलंबित होती. 
भारती शिपयार्ड कंपनी विरोधातील खटला एनसीएलटी न्यायालयाकडे सुरू असताना न्यायालयाने भारती शिपयार्ड टेकओव्हर करण्यासाठी एका कंपनीची नियुक्ती केली होती. 

  त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संबंधित कंपनीकडे प्रलंबित देण्याची विनंती केली होती. परंतु कंपनीने कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी आमदार उदय सामंत यांच्याकडेही पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आ.सामंत यांनी  देखील कर्मचाऱ्यांसाठी पाठपुरावा सुरु केला होता. 

  कर्मचाऱ्यांच्या सुदैवाने राज्याच्या उद्योगमंत्र्यांची धुरा ना.उदय सामंत यांच्याकडे आल्यानंतर ना.सामंत यांनी स्वतःहून कर्मचाऱ्यांचा हा  विषय हाती घेतला. भारती शिपयार्डचा ताबा योमेन मरीन कंपनीकडे आल्यावर ना.सामंत यांनी उद्योगमंत्री म्हणून योमेन मरीन  कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक धनंजय मिश्रा यांच्याशी चर्चा केली.

   मिऱ्यासह रत्नागिरीतील 195 कर्मचाऱ्यांचे 2 कोटी 50 लाख रुपये भारती शिपयार्ड कंपनीचे देणे होती. त्यावर चर्चा करून तडजोडीअंती कर्मचाऱ्यांना प्रत्येकाच्या वेतनानुसार एकूण 1 कोटी 75 रुपये देण्याचे श्री.धनंजय मिश्रा यांनी मान्य केले. त्यानुसार चार टप्प्यात कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तब्बल दहा वर्षानंतर ना.उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळेच मिळाली .

  गेली 10 वर्ष ना.उदय सामंत या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सातत्याने उभे राहिले आणि या कर्मचाऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला.
त्यानिमित्ताने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ना. सामंत यांचे आभार मानत जाहीर सत्कार केला. 

  यावेळी  उपस्थित मनोज साळवी , राकेश साळवी राजू किर संजय जोशी संजय बेडगे उदय चव्हाण लक्ष्मीकांत सावंत सचिन सावंत प्रविण शिवलकर  शैलेद्र सावंत महेश मोरे विकास कर्लेकर  निलेश मयेकर,अमोल पावसकर, अशोक मयेकर, राजू तांडेल.
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments