*चिपळूणचे हायटेक बसस्थानक बांधकाम लांबणीवर; प्रवाशांनी व्यक्त केला संताप*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*चिपळूणचे हायटेक बसस्थानक बांधकाम लांबणीवर; प्रवाशांनी व्यक्त केला संताप*
हायटेकच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम कित्येक वर्षानंतर पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले आहे. खूप दिवस होऊनही उर्वरित बांधकाम रखडलेल्या स्थितीत आहे. याशिवाय बांधकामाच्या ठिकाणी झाडीझुडपांनी वेढा घातला असून मोकाट श्वानासह जनावरानांही रखडलेल्या बसस्थानकाची इमारत आश्रयस्थान बनले आहे. याबाबत प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रखडलेल्या हायटेक बस स्थानकाच्या साडेसातीचे ग्रहण कधी सुटणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जीर्ण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने सोयी सुविधांयुक्त हायटेकच्या धर्तीवर बसस्थानक बांधण्यास काही वर्षापूर्वी प्रारंभ झाला. काही दिवस जाता त्यावेळचा ठेकेदार व एसटी महामंडळ याच्या कुचकामी भूमिकेमुळे या बसस्थानकाच्या बांधकामाचा सुरुवातीपासून बट्ट्याबोळ उडाला. परिणामी कित्येक वर्ष होऊनही बसस्थानकाचे बांधकाम रखडलेल्या स्थितीत होते. असे असताना हे बसस्थानक पूर्णत्वास जावे, यासाठी राजकीय पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळींनी आगार प्रशासनावर निवेदनाचा वर्षाव सुरु केला होता.
यातूनच महामंडळास जाग आल्यानंतर रखडलेले बसस्थानकाचे बांधकास सुरु करण्यासाठी पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका काढून त्या जागी नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. या ठेकेदाराने रखडलेल्या बांधकामासाठी गती घेतल्यानंतर कित्येक वर्षानंतर इमारतीचा पाया पूर्णत्वास गेला. इमारतीचे पिलर उभारल्यानंतर पहिल्या मजल्याचा स्लॅबचे कामही पूर्ण झाले आहे. एकूणच हे काम लक्षात घेता बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जाईल, अशीच अपेक्षा प्रवाशांनीही वर्तवली होती.
मात्र, पहिल्या स्लॅबच्या कामानंतर कित्येक दिवस होवून उर्वरित बांधकाम रखडले आहे. बांधकामा ठिकाणी कामगारही दिसेनासे झाले आहेत. इतकेच नव्हे दुर्लक्षाअभावी बांधकामाला झाडीझुडपाने वेढा घातला आहे. याशिवाय मोकाट श्वानासह जनावरानांही रखडलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत आसरा होत घेत असून अनेकांनी ऊन, पावसापासून दुचाकीचे संरक्षण व्हावे, यासाठी त्या ठिकाणी पार्किंग सुरु केले आहे. या अर्धवट बांधकामाविषयी प्रवांशातून तीव्र संताप व्यक्त होत असून बसस्थानक बांधकामाला कधी गती मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा