*नाव्या हरिदास यांना भाजपने वायनाडमधून प्रियंका गांधींच्या विरोधात दिली उमेदवारी!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*नाव्या हरिदास यांना भाजपने वायनाडमधून प्रियंका गांधींच्या विरोधात दिली उमेदवारी!*

भारतीय जनता पक्षाने शनिवारी केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नाव्या हरिदास यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवरून त्यांचा सामना काँग्रेस नेत्या आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशी होणार आहे. 

   आता वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि नाव्या हरिदास यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.*

या जागेवरून राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर उत्तर प्रदेशच्या रायबरेली सीटवरून खासदारकी कायम ठेवत वायनाडच्या जागेवरून राजीनामा दिला होता. 

 यानंतर ही जागा रिक्त झाली होती, त्यानंतर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पहिल्यांदाच निवडणुकीत उतरवले आहे.

दरम्यान प्रियंका गांधींच्या विरोधात भाजपने एक महिला उमेदवाराला संधी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंजक होणार आहे.

   भाजपने प्रियंका गांधी यांच्याविरोधात उमेदवारी दिलेल्या नाव्या हरिदास या नेमक्या आहेत कोण? हे आपण जाणून घेऊया.

नाव्या हरिदास या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. तसेच कोझिकोड कॉर्पोरेशनमध्ये त्या दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत आणि कोझिकोड महापालिकेत भाजपच्या संसदीय पक्षाच्या नेत्याही आहेत. 

 २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत कोझिकोड दक्षिण मतदारसंघातून त्या एनडीएच्या उमेदवार होत्या. त्या निवडणुकीत पराभूत होऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

नाव्या हरिदास यांचं वय ३९ वर्ष असून त्यांच्या पतीचे नाव शोभिन श्याम आहे. ते एक मेकानिकल इंजिनियर आहेत. नाव्या हरिदास या ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी केएमसीटी इंजीनियरिंग कॉलेज कालीकट विद्यापीठातून २००७ मध्ये बी. टेक केले आहे. त्या कोझिकोडे येथून नगरसेवक देखील राहिल्या आहेत. 

  २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपने नाव्या यांना मैदानात उतरवले होत. मात्र य़ा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या कोझिकोड दक्षिण(केरळ) मतदारसंघातून निवडणूक लढल्या होत्या.

२०२१ मध्ये कोझीकोड दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढलेल्या नाव्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या . 

 इंडियन नॅशनल लीगकडून अहमद देवरकोविलने इंडियन यूनियन मुस्लिम लीगच्या नूरबीना राशिद यांना १२५५९ मतांनी पराभूत केले होते. तीसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नाव्या यांना २४,८७३ मते मिळाली होती. तर पहिल्या स्थानावर राहिलेल्या अहमद दवरकोविल यांना ५२,५५७ मते मिळाली होती.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन जागांवरून निवडणूक लढवली होती. त्यांनी दोन्ही जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी वायनाडमधून राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभेची ही जागा रिक्त झाली होती. 

  निवडणूक आयोगाने ११ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा केली आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या