फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या तर्फे महिलांसाठी मॅमोग्राफी शिबिराचे नियोजन.

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या तर्फे महिलांसाठी मॅमोग्राफी शिबिराचे नियोजन.

   मुकुल माधव फौंडेशन आणि फिनोलेक्स कंपनी आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, स्वच्छता आणि समुदाय विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत.या नवरात्रीच्या निमित्ताने महिला सबलीकरणच्या  दिशेने एक पाऊल पुढे टाकत वालावलकर रुग्णालयात संकल्प २०२४ मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन केले आहे.

  या शिबिरांचा प्रवास 2014 मध्ये परकार हॉस्पिटल, रत्नागिरी येथे सुरू झाला.आपल्या समाजातील महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन गेल्या 10 वर्षांपासून कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक काळातही कोणत्याही व्यत्ययाशिवाय द्विवार्षिक मॅमोग्राफी शिबिरे आयोजित करत आहेत. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि नवरात्रीच्या सणाची संधी घेऊन ही शिबिरे वर्षातून दोनदा आयोजित केली जात आहेत. 

  रत्नागिरीची भोगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन उत्तरेकडील तालुक्यांसाठी २०१९पासून वालावलकर हॉस्पिटलच्या सहकार्याने ही शिबिरे चालू करण्यात आली. 

  आजपर्यंत अशी १५ शिबिरे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली असून हे १६वे शिबिर आहे. या शिबिरांचे विषेश  म्हणजे  केवळ या शिबिरांचे आयोजन करत नाही तर शिबिरानंतर पाठपुरावा देखील केला जातो. या शिबिरांचा आजपर्यंत ५००० पेक्षा जास्त  महिलांनी लाभ घेतला आहे. 

  या शिबिराचे  उद्घाटनाला डॉ. वाळवेकर (एचओडी, स्त्रीरोग विभाग), डॉ. वेल्हाळ (एचओडी पीएसएम विभाग), डॉ. मानसिंगराव घाडगे (डीन आणि एचओडी सर्जरी विभाग), श्रीमती कदम (सरपंच वहाळ गाव), आणि डॉ. आसावरी मोडक (वालावलकर हॉस्पिटल) आणि श्री सत्यब्रत नायक फिनोलेक्स कडून   व मुकुल माधव फौंडेशनचे  प्रतिनिधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. 

डॉ. वाळवेकर यांनी मुकुल माधव फौंडेशन आणि फिनोलेक्स कंपनी द्वारे आयोजित द्विवार्षिक शिबिराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून महिला सक्षमीकरणातील मुकुल माधव फौंडेशनच्या  च्या प्रभावी कार्याचे कौतुक केले. डॉ. वेल्हाळ यांनी मॅमोग्राफी शिबिराच्या आयोजनाबद्दल आभार मानले आणि उपस्थितांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संदेश देण्याचे आवाहन केले .

   ज्यामुळे जास्तीत जास्त स्त्रिया शिबिराचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांची संपूर्ण तपासणी करू शकतील. 

वालावलकर हॉस्पिटलसोबतचा हा संयुक्त उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल डॉ. सुवर्णा पाटील आणि डॉ. वाळवेकर यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त सौ रितू प्रकाश छाब्रिया यांचे विशेष आभार मानले. या शिबिराचे आयोजन करून लाभार्थी महिलांना खूप आनंद झाला आणि सर्व महत्त्वाच्या चाचण्या फक्त १०० रुपयात  केल्या जात असून पाठपुरावा सुविधाही एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत.

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments