*आमच्या पक्षाचे मंत्री येतात हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नव्हते. त्यामुळे दिपक केसरकर हे “क्रेडिट” घेण्यासाठी हा सर्व कार्यक्रम गुपचूप करण्याच्या प्रयत्नात होते.तर केसरकरांच्या हेकेखोरीमुळे वेळागरचा प्रकार घडला--माजी आमदार राजन तेली*
*फ्रेश न्यूज रत्नागिरी*
*आमच्या पक्षाचे मंत्री येतात हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नव्हते. त्यामुळे दिपक केसरकर हे “क्रेडिट” घेण्यासाठी हा सर्व कार्यक्रम गुपचूप करण्याच्या प्रयत्नात होते.तर केसरकरांच्या हेकेखोरीमुळे वेळागरचा प्रकार घडला--माजी आमदार राजन तेली*
*धक्काबुक्कीत जखमी झालेल्या वेळागरवासीयांची राजन तेलींनी घेतली भेट*
वेंगुर्ले:--- दीपक केसरकर यांच्या हेकेखोरीमुळे आणि मी पणामुळेच ताज हाॅटेलचा पायाभरणी समारंभ होऊ शकला नाही. त्या ठिकाणी ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यामुळे मंत्र्यांसमोर त्यांना वेळागरवासीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले, असा आरोप भाजप नेते राजन तेली यांनी केला.
आमच्या पक्षाचे मंत्री येतात हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नव्हते. त्यामुळे दिपक केसरकर हे “क्रेडिट” घेण्यासाठी हा सर्व कार्यक्रम गुपचूप करण्याच्या प्रयत्नात होते, असेही तेली यांनी सांगितले.*
वेळागर येथे झालेल्या प्रकारानंतर त्या ठिकाणी जखमी झालेल्यांच्या भेटण्यासाठी राजन तेली यांनी शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय धाव घेतली.
त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, हा सर्व प्रकार हा केसरकारांच्या मी पणामुळे घडला आहे. या ठिकाणी ताज हॉटेलसाठी कोणाचा विरोध नाही. मात्र ९ हेक्टर जागा वगळावी, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत ग्रामस्थांचे प्रश्न न सोडवता त्या ठिकाणी पायाभरणी समारंभ लवकरात-लवकर आटपण्यासाठी केसरकर यांनी प्रयत्न केला.
विशेष म्हणजे याबाबत त्यांनी भाजपचे मंत्री येत असताना सुद्धा भाजपच्या मंत्र्यांना कल्पना दिली नाही. हा सर्व प्रकार क्रेडिट घेण्यासाठी होता. परंतु ग्रामस्थांना त्याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी हा प्रकार आणि पायाभरणी समारंभ उधळुन लावला. केसरकर हे नेहमी क्रेडिट मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मात्र स्थानिक ग्रामस्थांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणती सकारात्मक भूमिका घेतली नाही. गेले अनेक महिने येथील स्थानिक ग्रामस्थ आमच्या मागण्या पूर्ण करा आणि नंतर हा या प्रकल्पाची पायाभरणी करा, अशी मागणी करत होते. मात्र खोटी आश्वासन देऊन त्यांनी त्या ग्रामस्थांना या प्रक्रियेपासून दूर ठेवले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री येणार हे भाजपच्या एकाही कार्यकर्त्यांला माहिती नव्हती. मंत्र्यांनी स्वतः फोन केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. झालेला प्रकार हा योग्य नाही.
आपण या प्रकाराचे समर्थन करणार नाही. परंतु केसरकारांच्या एककल्ली धोरणामुळे ही घटना घडली, असे ते म्हणाले.*
➖➖➖➖
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी
फॉलो
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment