वाराणसीपाठोपाठ लखनौमध्येही साईबाबा हटाओ मोहीम! अखिल भारतीय हिंदू महासभेचा फतवा!!

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

वाराणसीपाठोपाठ लखनौमध्येही साईबाबा हटाओ मोहीम! अखिल भारतीय हिंदू महासभेचा फतवा!!

  'सबका मालिक एक है' असा विश्वजागर करणारे महान संत साईबाबा यांना वाराणसीपाठोपाठ लखनौतूनही विस्थापित करण्यात आले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने लखनौतील सर्व मंदिरांमधून साईबाबांच्या प्रतिमा तसेच मूर्ती काढून टाकण्याचे फर्मान सोडले आहे. 

  दरम्यान, काशीतील मंदिरांमधून काढण्यात आलेल्या साईबाबांच्या मूर्ती गंगेत टाकून देण्यात आल्याचे संतापजनक वृत्त आहे.*

साईबाबांची पूजा करणे म्हणजे प्रेताची पूजा करण्यासारखे आहे, असे विखारी मत व्यक्त करीत केंद्रीय ब्राह्मण सभेने वाराणसीतील सर्व मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती तसेच प्रतिमा काढून टाकण्याचा फतवा काढला. त्यानुसार सनातन रक्षक दलाने 18 मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती काढल्या. 

  या मूर्ती पांढर्‍या कापडात गुंडाळून गंगेत सोडून देण्यात आल्या. केंद्रीय ब्राह्मण सभेने काढलेल्या साईबाबाविरोधातील फतव्याचे लोण लखनौमध्येही पोहोचले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने सर्व मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती काढून टाकण्यात याव्यात, असे फर्मान सोडले आहे.

सनातन धर्मात साईबाबांची पूजा सांगितलेली नाही. साईबाबांची पूजा म्हणजे प्रेताची पूजाच आहे. मंदिरामध्ये भुताची पूजा कशी होऊ शकते? असा प्रश्न उपस्थित करून केंद्रीय ब्राह्मण सभेने कोणत्याही शास्त्रात साईबाबांच्या पूजेचा उल्लेख नाही, असेही म्हटले आहे. काशीतील बडा गणेश मंदिरातून साईमूर्ती हटवण्यात आली असून तेथे माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे.

   लोकांनी आपल्या घरात साईबाबांची पूजा करण्यास हरकत नसल्याचे सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले. आम्ही शंभर मंदिरांची यादी बनवली असून प्रत्येक मंदिरात जाऊन आम्ही साईबाबांची मूर्ती काढण्याची सूचना केली असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

अज्ञानामुळे लोक साईबाबांच्या भक्तीमध्ये लिन झाले होते असे बडा गणेश मंदिराचे महंत रम्मू गुरू म्हणाले. अन्नपूर्णा मंदिराचे महंत शंकर पुरी यांनी मूर्ती काढण्याचे समर्थन केले. 

  शास्त्रांमध्ये साईबाबांच्या मूर्तीची पूजा करण्याचे सांगितलेले नाही, असे ते म्हणाले.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments