पाचल विभागातून आमदार राजन साळवी यांना प्रचंड मताधिक्य मिळणार असा आमचा ठाम विश्वास आहे: माजी उपजिल्हा प्रमुख, माजी सरपंच अशोक सक्रे यांची प्रतिक्रिया

रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे तालुक्यात मोठी रोजगार निर्मिती होणार होती. मात्र या प्रकल्पाला ग्रामीण भागातून तीव्र विरोध झाला. महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं की जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती मधील नेते मंडळी रिफायनरी प्रकल्पावर काहीच भाष्य करताना दिसून येत नाहीत. राजापूर तालुक्यातील बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी जनतेच्या मागणी नुसार जे उद्योग आणले पाहिजेत ते उद्योग येत नाहीत. ज्या प्रकल्पलांना जनतेचा पाठिंबा आहे त्यांचे आम्ही नेहमीच समर्थन करू. आता जे नेते स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलत राहिले ते नेते जनतेचे काय प्रश्न सोडविणार असा सवाल राजापूर तालुक्यातील पाचल माजी सरपंच आणि माजी उपजिल्हा प्रमुख अशोक सक्रे यांनी उपस्थित केला आहे.

राजापूर तालुक्यात धनुष्य बाणाने विकास केला नाही असे महायुतीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मग त्यांना आता धनुष्यबाणच चिन्ह कशाला हवे आहे? ज्या नेत्यांनी आपल्या फायद्यासाठी नेहमी पक्ष बदलत राहिले. ते नेते जनतेचे प्रश्न काय सोडविणार. राजापूर तालुक्यात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. रिफायनरी सारखे मोठे प्रकल्प राजापूर तालुक्यात राबवले गेले असते तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली असती आणि जनतेचा सुद्धा संबंधित राजकीय पक्षाला पाठिंबा सुद्धा मिळाला असता. मात्र आता काही नेते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रिफायनरीच्या मुद्द्यावरून गप्प बसले आहेत. त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी.

मी स्वतः शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केलेले आहे. आज रत्नागिरी मध्ये काय विकास कामे होतात ते जनतेला माहिती आहे. राजापुरात ठेकेदारी नको आहे तर सामाजाची सेवा करणारा नेता हवा आहे. आमदार राजन साळवी हे मतदारसंघात चौवीस तास सक्रिय असतात. आमच्या पाचल विभागातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल असा आमचा ठाम विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया अशोक सक्रे यांनी व्यक्त केली आहे.

Comments