सिंधुदुर्ग एमआयडीसीमध्ये येणार फार्मा उद्योजक, कोकणवासीयांना मिळणार रोजगार

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

सिंधुदुर्ग एमआयडीसीमध्ये येणार फार्मा उद्योजक, कोकणवासीयांना मिळणार रोजगार
- उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न 
- सिंधुदुर्ग एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी ॲड. सुशीबेन शाह यांनी फार्मा क्षेत्रातील गुंतवणूकदारांना केले एकत्र.

प्रतिनिधी, 

मुंबई : सिंधुदुर्गात एमआयडीसी उभी करून गावकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश आहे. तसेच कोकणाचा विकास व्हावा, या दृष्टीने पावले उचलली जात आहे. सरकारने या प्रकल्पासाठी ११,००० एकर जमीन राखून ठेवली आहे आणि हा प्रकल्प एमआयडीसी अंतर्गत असेल. जिल्हा सिंधुदुर्ग (ता. दोडामार्ग) येथील आडाळी येथे औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यासह देशभरातील औषध निर्माण व वैद्यकीय यंत्रसामग्री उत्पादक हजर होते. 

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, कोकणामध्ये इंडस्ट्री येत असताना आमचे काही लोक त्याला विरोध करतात. पण आता ही मानसिकता बदलली आहे. दीपक केसरकर यांनी जो आता पुढाकार घेतला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. मेडिकल डिवाइस तयार करण्यासाठी आपल्याला कोणतीही मदत लागणार असेल, तर ती आपण देऊ. फार्मामधील जेवढे लोक कोकणाकडे येतील त्यांचे आम्ही स्वागत नक्कीच करू. 

सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या आणि सागरी समुद्राने संपन्न असा आहे. आरोग्यदायी वातावरण, शून्य प्रदूषण आणि सहकार्य करणारी लोक आहेत. तसेच गोवा राज्य जवळ असणे हे औद्योगिक उद्योगासाठी महत्त्वाचे आहे. माझ्या कोकणातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला तर त्याचे शहरातले व इतर राज्यातील स्थलांतर कमी होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

जिल्ह्यात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि विमान सेवा उपलब्ध आहे. तसेच वीज व पाणी सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नैसर्गिक दृष्ट्या संपन्न अशी जागा आहे. त्या ठिकाणची जागा ही उंच व सखल स्वरूपात आहे. ती जागा सरळ करून देण्याचे काम एमआयडीसीचे आहे. उद्योजकांना सगळ्या सुखसोयी एमआयडीसीकडून पुरविल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी दिली. याप्रसंगी एमआयडीसीचे अधिकारी, मोठमोठ्या फार्मा कंपनीच्या मालक व उद्योजक आदींची उपस्थिती होती. 

चौकट 

कोकणाचा विकास नक्कीच होणार! 

सिंधुदुर्ग हा जिल्हा अतिशय सुंदर आहे. आपण जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र स्थापन केले असून आता फार्मा क्षेत्रातील गुंतवणूकदार हे देखील जोडले गेले आहेत. त्यामुळे कोकणाचा विकास हा नक्कीच होणार आहे.
- ॲड. सुशीबेन शाह, शिवसेना प्रवक्त्या
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments