गणपतीपुळ्याला जाणाऱ्या पर्यटकांना करावा लागतोय खड्ड्यांशी सामना
रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे मानले जाणारे पर्यटन स्थळ म्हणजे गणपतीपुळे. भव्य असा समुद्र किनारा, वळणावळणाचा रस्ता, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आकर्षित होतो. इथला आरे वारे बीच वर तर वर्षाचे बाराही महिने पर्यटक येत असतात. मात्र या सर्व पर्यटकांना सध्या रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोठमोठे नेते मंडळी सतत बोलत असतात की कोकणात पर्यटन विकास झाला पाहिजे. पर्यटनातून मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. अशा अनेकवेळा घोषणा होंतात. परंतु याच गणपतीपुळे परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास खरंच होतोय का असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. गणपतीपुळे गावातील आजूबाजूचा परिसर अधिकाधिक स्मार्ट होणे गरजेचे होते. पर्यटकांना अत्याधुनिक सुविधा मिळणे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात तसे दिसून येत नाहीत. रत्नागिरी शिरगाव मार्गे आरे वारे मार्गे गणपतीपुळे रस्ता पर्यटकांना आकर्षित करणारा मार्ग मानला जातो. हा रस्ता काहीशा प्रमाणात चांगला आहे. मात्र काही भागात या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. त्यामुळे पर्यटन विकासाच्या वार्ता सत्यात कधी उतरणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. रत्नागिरी हाताखंबा मार्गे रत्नागिरी तिथून साळवी स्टॉप पासून गणपतीपुळे या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या झपाट्याने सुरू आहे. मात्र या रस्त्याचे काम सुरू असताना पर्यटकांसाठी दुसऱ्या पर्यायी मार्ग सुचवणे गरजेचे आहे. गणपतीपुळे, मालगुंड, जयगड या भागात पर्यटकांना फिरण्यासाठी निवळी मार्गे सुद्धा चांगला रस्ता आहे. मात्र हा रस्त्याच्या पर्यायाचे चांगले होर्डींग किंवा पोस्टर्स लागणे आवश्यक आहे. जेणे करून पर्यटकांना त्रास होणार नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Comments
Post a Comment