*पर्यटकांची दिवाळीच्या सुट्टीत कोकणला पसंती; नोव्हेंबरपासूनचे पर्यटकांचे बुकिंग फुल्ल*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*पर्यटकांची दिवाळीच्या सुट्टीत कोकणला पसंती; नोव्हेंबरपासूनचे पर्यटकांचे बुकिंग फुल्ल*
दिवाळीच्या सुट्टयांमध्ये कोकणातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील परिसरातून कोकणामध्ये सुमारे २ ते ३ लाख पर्यटक दाखल होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. कोकणातील रिसॉर्टमध्ये १ नोव्हेंबरपासूनच पर्यटकांनी बुकिंग करून ठेवले आहे. पुढच्या काळातील बुकिंगसाठी पर्यटकांकडून चौकशी केली जात आहे. काहींनी मात्र तीन-चार महिने आधीच नियोजन करून कोकणात दिवाळी साजरी करण्याचे पक्के केले आहे.
मुंबई-पुण्यातील धावपळीपासून दूर, नीरव शांतता अनुभवत समुद्राच्या साक्षीने दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात येत असतात. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, काशीद, हरिहरेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर, दापोली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण व कुडाळ, निवती, आचरा, तारकर्ली, सावंतवाडी, आंबोली या ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती असते. अथांग समुद्रकिनारा हे पर्यटनाचे मुख्य आकर्षण असते. नमन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि येथील विविध कलाप्रकार दाखविण्यासाठी काही रिसॉर्टमधून सायंकाळच्या वेळी याचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांना केवळ शांतता हवी असते. येथील निसर्ग अनुभवायचा असतो. आणि म्हणून न चुकता ही कुटुंब येथील शांत वातावरणाचा अनुभव घेत दिवाळी साजरी करण्यासाठी येतात.
*आचारसंहिता लागली असल्याने समस्या*
पर्यटकांना येथील सुंदर समुद्र किनाऱ्यांचा, येथील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेताना मनोरंजनाचे चार क्षण घालवता यावेत यासाठी कोकणातील संगीत कार्यक्रम, डॉल्फिन सफारी यांचे आयोजन पर्यटन व्यावसायिक करतात. समुद्रातील सफर, किनाऱ्यांवरील विविध खेळ, डॉल्फिन दाखविण्याची व्यवस्था यासाठी बोटींची व्यवस्था करण्यापासून पर्यटकांचे विविध प्रकारे मनोरंजन करण्यासाठी येथील पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले आहेत. कोकणातील निसर्गाची माहिती व्हावी, येथील जैवविविधता कळावी यासाठी निसर्ग सहलींचे आयोजनही काही निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे. मात्र विधानसभेची आचारसंहिता असल्याने पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
*पर्यटनाला चालना*
मोठ्या शहरातील अनेकांना कोकणाबद्दल आपुलकी आणि कुतुहल असते. असे कोकणप्रेमी विविध मार्गानी कोकणची माहिती मिळवत पर्यटनासाठी जिल्ह्याला पसंती देत असल्याने येथील पर्यटन उद्योगाला चालना मिळत राहते. मुंबई-पुण्यातील धावपळीपासून दूर, नीरव शांतता अनुभवत समुद्राच्या साक्षीने दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात येत असतात. श्रीवर्धन, मुरुड, काशीद, हरिहरेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर, दापोली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण व कुडाळ, निवती, आचरा, तारकर्ली, सावंतवाडी, आंबोली या ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती असते.
...................................
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा