*आईच्या सहवासाला व्याकूळ झालेल्या मुलाची अनाथाश्रमातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या*
*आईच्या सहवासाला व्याकूळ झालेल्या मुलाची अनाथाश्रमातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या*
भाईंदर येथील उत्तन परिसरात असलेल्या 'केअरिंग हँड्स सेवा कुटीर' अनाथाश्रमात असलेल्या एका आठ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. आश्रमातीलच एका विहिरीत उडी घेत त्याने जीव दिला.
आईच्या सहवासाला व्याकूळ झालेल्या या मुलाने टोकाचे पाऊल गाठले. त्याच्या आईने दुसरा विवाह केल्याने त्याला अनाथाश्रमात ठेवण्यात आले होते. त्यामुळे तो आपल्या आईला सतत 'मला घेऊन चल.. मला येथे राहायचे नाही' अशी विनवणी करत होता. त्याची आर्त हाक आईपर्यंत पोहोचलीच नाही. परिणामी ती त्याला तिथेच सोडून गेल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले.
'मला येऊन घेऊन चल' ही त्याची विनवणी आईने न ऐकल्याने आणि आईच्या सहवासासाठी व्याकूळ झालेल्या या मुलाला भावना असह्य झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे भाईंदर येथे खळबळ उडाली आहे. एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, सदर मुलास आठ महिन्यांपूर्वी या अनाथाश्रमात दाखल करण्यात आले होते. त्याच्या आईने दुसरा विवाह केल्याने त्याची येथे पाठवणी करण्यात आली होती. मात्र, आश्रमात आल्यापासून तो अस्वस्थ होता. तो येथे राहायला आला असला तरी, त्याची आई अधूनमधून त्याला येथे भेटण्यासाठी येत होती. ती जेव्हा केव्हा त्याला भेटायला यायची तेव्हा तो रडायचा... मला येऊन घेऊन चल म्हणायचा..मला येथे राहायचे नाही...मला तुझ्यासोबतच राहायचे आहे, अशी तो विनवणी करायचा. पण, त्याची आई त्याला तिथेच सोडून जायची.
पाठिमागील महिन्यात या मुलाची आई त्याला भेटण्यासाठी अनाथाश्रमात आली होती. या वेळीही त्याने तिच्याकडे मला घेऊन चल.. मला येथे करमत नाही. मला तुझ्यासोबतच राहायचे आहे, अशी गळ घातली. पण, आईचे हृदय द्रवले नाही किंवा त्याला घरी घेऊन जाण्यासारखी परिस्थिती नसल्याचे तिने त्याला सांगितले, व घेऊन जाणे टाळले. त्यावेळीही ती त्याला तेथेच सोडून गेली. त्यानंतर हा मुलगा प्रचंड निराश झाला.
अखेर सोमवारी रात्री अनाथाश्रमातील सर्वजण झोपी गेले असता या मुलाने जवळच असलेली विहीर गाठली आणि त्यात उडी घेऊन आयुष्य संपवले. सकाळी सर्वांना जाग आली असता हा मुलगा आढळून आला नाही. त्यामुळे शोधाशोध केली असता जवळच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. घडल्या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment