आबलोली येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप..!
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील शासनमान्य रेशन दुकानात गणेश चतुर्थी निमीत्ताने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेला "आनंदाचा शिधा" लाभार्थींना शंभर रुपयांमध्ये नुकताच वाटप करण्यात आला या "आनंदाचा शिधा" मध्ये प्रामुख्याने चार वस्तूंचा समावेश होता यामध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर योग लाईफ रिफाईंड सोयाबीन ऑईल (गोडेतेल) अशा चार वस्तू वाटप करण्यात आल्या आणि गरीबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले..!
Comments
Post a Comment