मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव रत्नागिरी येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.

मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव रत्नागिरी येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.....
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव, रत्नागिरी येथे विद्यालयाच्या विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या मार्फत दी. २ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. 
त्या निमित्ताने प्रथमतः डॉ. आशिष मोहिते , प्राचार्य यांनी महात्मा गांधीजी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यानंतर सर्व अधिकारी / कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी जय धनु व हंसिका म्हात्रे या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. आशिष मोहिते तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी महात्मा गांधीजी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती यांचे औचित्य साधून विद्यालयाच्या प्राचार्य यांच्या मार्गर्शनाखाली विद्यालयाच्या परिसरात स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या इमारती तसेच परिसर याची साफसफाई करण्यात आली. स्वच्छ्ता अभियानात सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविले.

Comments