निवळी बावनदी येथे कंटेनरचा अपघात, कंटेनर घुसला घरात ---
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
निवळी बावनदी येथे कंटेनरचा अपघात, कंटेनर घुसला घरात ---
शनिवारी दिनांक 12/10/2024 रोजी रात्री 07.45 वाजताच्या सुमारास रत्नागिरी ते मुंबई हायवेने एक कंटेनर भरधाव वेगात जात असताना बावनदी भाजप शाखेजवळ आला असता कंटेनरवरील चालक मद्यधुंद अवस्थेत असलेने त्याचे कंटेनरवर नियंत्रण न राहिल्याने कंटेनर शाखेच्या शेजारी उभ्या असलेल्या 2 दुचाकी गाड्यांना चिरडून नेत रस्त्यालगतच्या दुकानाला धडक देऊन एम एस ई बी चा पोल तोडून पुढे विजय आडवीलकर यांच्या घरात घुसला.
असा भयानक मोठा अपघात झाला परंतु तेथे कोणीही माणूस नसल्याने मनुष्य हानी टळली. सदर अपघातामुळे पोल चे नुकसान होऊन शॉर्ट सर्किट झालेने तेथे असलेल्या पत्र्याच्या स्टॉलला सगळीकडेच विद्युत वहिनीचा शॉक लागू लागला. तेथील असलेल्या 7 ते 8 पत्र्याच्या स्टॉल पैकी 3 स्टॉलचे पूर्ण नुकसान झाले.
त्यापैकी एका स्टॉलमधे वैशाली
विजय आडविलकर या त्यांचे दुकानात अडकलेल्या होत्या व त्या या कंटेनर चे अपघातात जखमी झाल्या. स्टॉलला सगळीकडे शॉक बसत असल्याने कोणीही त्यांना मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते.
परंतु घडलेल्या घटनेचे प्रसंगावधान राखून संजय निवळकर यांनी तेथे जाऊन एम.एस.ई.बी शी संपर्क साधून तेथील विद्युत प्रवाह तात्काळ बंद करण्यास सांगून वैशाली आडविलकर यांना त्यांच्या पत्र्याच्या स्टॉल दुकानातून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी तात्काळ सिव्हील हॉस्पिटल येथे स्वतःच्या वाहनातून नेऊन दाखल केले. त्यामुळे त्यांचेवर तात्काळ उपचार सुरू होऊन त्यांचे प्राण वाचले व मनुष्य हानी टळली.
तसेच त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली असता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री यादव हे घटनास्थळी पोहचले व त्यांनी उपस्थित लोकांकडून सर्व माहिती घेतली.
तसेच हायवेच्या ईगल इंफ्राच्या माध्यमातून पोकलांड आणि हायड्रा मागवून घेऊन संजय निवळकर यांनी कंटेनर स्वतः चालवत नेऊन बाजूला काढून दिल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत मोकळा करून दिला. कंटेनरचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याचे वर ग्रामीण पोलीस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
तसेच सदर अपघातातील कंटेनर पोलीस ठाणे येथे जमा आहे. या घटने दरम्यान दोन दुचाकीचे नुकसान झालेले आहे आणि तेथील व्यावसायिकांचे सुद्धा नुकसान झालेले आहे.
घटनेच्या दरम्यान निवळी गावचे उपसरपंच संजय निवळकर, श्रीपाद गांधी, संतोष सुतार , पार्थ सुतार, हर्ष आडविलकर, सुयोग सावंत, अनिकेत सावंत ,ओमकार सावंत ,निलेश सावंत, नितेश सावंत लहू लोहार राजू सुरेश निवळकर विष्णू पवार , बाबू शिर्के व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर अपघातात विद्युत वाहिनी पोल चे नुकसान झाल्याने 2 दिवस विद्युत पुरवठा बंद होता तो काल रोजी महावितरण चे अधिकारी यांचेशी संपर्क करून त्याचे काम करून घेऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याने महावितरणचे , तसेच ईगल इन्फ्रा ने ही वेळेचे व घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन तात्काळ मदत उपलब्ध करून दिली.
त्याबद्दल त्यांचे ही आभार संजय निवळकर यांनी व्यक्त केले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment