*सायबर गुन्ह्यात सर्वात जास्त गुन्हे हे ट्रस्ट फ्रौड चे असतात...*


*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*सायबर गुन्ह्यात सर्वात जास्त गुन्हे हे ट्रस्ट फ्रौड चे असतात...*


▪️गुन्हेगार हा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला नको त्या ठिकाणी विश्वास ठेवण्यापासून वाचायचे असते...

▪️हा "खेळ" आहे. एकदा विश्वास संपादन केले की कितीही पैसे लुटता येतात...

▪️विक्टिम झालेली व्यक्ती विक्टीम का होते?* याचा अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की *त्या व्यक्तीला विश्वास कुठे? का? ठेवावा याचे प्रशिक्षण मिळालेले नसते

▪️आपल्या मेंदूला ऑफलाइन माणसं ओळखण्याचे, विश्वास ठेवायचे , कोणावर ठेवायचा याचे प्रशिक्षण मिळालेले असते, परंतु सायबर स्पेस मध्ये जिथे सर्व काही बिन चेहऱ्याचे आहे, टेलिफोन, ऑडिओ, व्हिडिओ व्हाट्सअप, फेसबुक, वेबसाईट, टेलिग्राम, वॉलेट हे सर्व काही स्क्रीनवर दिसत असते त्यामागे व्यक्ती कोण आहे हे माहिती नसते, तरीसुद्धा लोकं स्क्रीनवर विश्वास ठेवतात आणि तिथे फसवणुकीला सुरुवात होते*

▪️हा सगळा खेळ गुन्हेगारांना करणे सहज शक्य होते कारण समाजात, शाळेत, कॉलेजमध्ये, कुटुंबामध्ये हे कधीही शिकविले जात नाही की *ऑनलाइन स्क्रीनवर दिसणारे हे मुळात खोटे आहे.

▪️हे गृहीत धरून ते खरे आहे याची खात्री पटत नाही, तोपर्यंत यावर विश्वास ठेवू नका* तुम्हाला व्हाट्सअप वर फेसबुक वर ई-मेलवर स्क्रीनवर इतका विश्वास आहे की खात्री करायची गरज वाटत नाही आणि इथूनच फसवणुकीला सुरुवात होते.

▪️त्यामुळे तुम्ही शिक्षक आहात, डॉक्टर आहात, पोलीस आहात, प्रशिक्षक आहात का अजून कोणी याचा काही संबंध नाही.
तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये हुशार असू शकता, तुमच्या विषयाचं तुम्हाला नॉलेज असू शकतं, परंतु सायबर स्पेस मध्ये मात्र आपण सर्व बालवाडीतच आहो आणि इथे सर्व काही तुम्हाला मुळातून एबीसीडी शिकायचे आहे.
त्यामुळे आपण नुकतेच चालायला सुरुवात झालेल्या बालकाप्रमाणे अत्यंत सावधपणे हळूहळू चालले पाहिजे.
जे समजत नाही, ते समजून घेतले पाहिजे. 
कुठे विश्वास ठेवावा आणि का विश्वास ठेवावा याची पडताळणी आपण स्वतः करायला शिकले पाहिजे, जसे प्रत्यक्षात तुमच्यासमोर आलेली व्यक्ती काय बोलते त्यावर विश्वास ठेवावा का नाही हे प्रत्येक जण आपल्या आपल्या अनुभव आणि प्रशिक्षणातून शिकत असतो आणि त्याप्रमाणे किती पुढे जावं हे ठरवत असतो.

▪️ऑनलाइन  मेट्रोमोनिअल फ्रॉड मध्ये सुद्धा महिला मुली इतके चटकन पटकन विश्वास ठेवून लाखो रुपये देतात की प्रत्यक्षात त्यांच्या नवऱ्याने किंवा होणाऱ्या नवऱ्याने इतके पैसे मागितले तर त्यांना ते प्रत्यक्षात देणार नाहीत, कारण प्रत्यक्षात कोणावर किती विश्वास ठेवून किती पैसे द्यावे याचे त्यांना प्रशिक्षण असते. 

▪️परंतु सायबर स्पेस मध्ये मात्र असे प्रशिक्षण नाही, त्यामुळे आता नवीन प्रशिक्षण देताना जसे गुड टच बॅड टच वगैरे प्रशिक्षण लहान मुलांना शिकवतात, तसे सायबर स्पेस मधील नवशिक्या व्यक्तींना म्हणजेच आपल्या सर्वांना *लिटिल ट्रस्ट ,लेस ट्रस्ट, मिडीयम ट्रस्ट, गुड ट्रस्ट, फुल ट्रस्ट याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे*.

▪️सात रूपयांना मिळणारा बिस्किटचा पुडा ऑनलाईन पाच रूपयाला मिळतो म्हणून आलेल्या लिंक ला टच करून ओटीपी देऊन बचत खात्यातील नव्वद हजार रूपये गमवाणारी एका पंचावन्न वर्षे उच्चशिक्षित महिलेची FIR एका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे .

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org