*जागा जाहीर होण्याआधीच शेकापचे उमेदवार जाहीर, महाविकास आघाडीला झटका? पडद्याआड काय घडतंय?*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*जागा जाहीर होण्याआधीच शेकापचे उमेदवार जाहीर, महाविकास आघाडीला झटका? पडद्याआड काय घडतंय?*

महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे ना? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण एकीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तणाव पाहायला मिळाला.

   हा तणाव आता मिटला असून जागावाटपही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अंतिम जागावाटप जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

  त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा केली आहे.

  जयंत पाटील यांच्याकडून आतापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय आपण महाविकास आघाडी सोडणार नाही, असं देखील स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.*

“आम्ही प्रागतिक आघाडी म्हणून लढतो आहोत. आम्ही आघाडीतून बाहेर जातो, अशी चर्चा आहे. पण त्या प्रकारची कोणतेही कृत्य आमच्याकडून होणार नाहीत. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात शेकापचे आमदार काम करणार आहेत”, असं जयंत पाटील यांनी जाहीर केलं.

   यावेळी जयंत पाटील यांनी अलिबाग मतदारसंघासाठी चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर पनवेल मतदारसंघातून बाळाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच उरणमधून प्रितम पाटील, पेणमधूल अतुल म्हात्रे आणि लोहा कंधार येथून शामसुंदर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली.

*सांगोला मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा*

विशेष म्हणजे ठाकरे गट दावा करत असलेल्या सांगोला मतदारसंघासाठी देखील शेकापकडून उमेदावाराची घोषणा करण्यात आली आहे. शेकापकडून सांगोला मतदारसंघासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

 सांगोल्यातील माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने मविआत उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. ठाकरे गट दीपक साळुंखे यांना उमेदवारी देऊ इच्छुक आहे. तर शेकापदेखील या जागेसाठी आग्रही आहे. 

  तसेच शेकापने बाबासाहेब देखमुख यांची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर केली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

*‘हे रडगाणं 4 तारखेपर्यंत चालू रहाणार’*

दरम्यान, “आमची दोन-तीन उमेदवारांची मागणी आहे. पण आम्ही मविआत बंड करणार नाही. महाराष्ट्रातील वातावरण आज युतीच्या विरोधात आहे. त्याला गालबोट लावणारं कृत्य आमच्याकडून होणार नाही. 

  शरद पवारांनी सांगितलं की, मी स्वतः शेकापसोबत आहे. त्यामुळे शेकापला जागा मिळणार. हे रडगाणं 4 तारखेपर्यंत चालू रहाणार”, अशीदेखील प्रकिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org