*बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळा संचालकांना अटक; तुषार आपटे आणि उदय कोतवाल पोलिसांच्या ताब्यात*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळा संचालकांना अटक; तुषार आपटे आणि उदय कोतवाल पोलिसांच्या ताब्यात*


बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात तातडीने कारवाई करण्यास उशीर केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आणि आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर अखेर ठाणे पोलिसांनी आदर्श विद्यामंदिर बदलापूर शाळेच्या दोन विश्वस्तांना बुधवारी (2 ऑक्टोबर) अटक केली आहे. शाळा अध्यक्ष उदय कोतवाल आणि शाला सचिव तुषार आपटे अशी या दोघांची नावे आहेत. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना कर्जत येथून अटक केली.

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर नावाच्या एका शाळेत बालवाडीतील चार आणि पाच वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये घडलेल्या या घटनेमुळे व्यापक जनआक्रोश करण्यात आला. कोर्टातही हे प्रकरण खळबळ माजवत आहे. ज्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही अटक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला याआधीच अटक करण्यात आली होती. मात्र, पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झाला. तो शाळेत सफाई कामगार होता.                                       

उदय कोतवाल (शाळेचे अध्यक्ष) आणि तुषार आपटे (शाळेचे सचिव) यांना अटक करण्यास विलंब केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालायने पोलिसांना जोरदार झापले. तसेच, या दोघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळून लावला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने, इतर प्रकरणांमध्ये त्वरित अटक करण्यासाठी ओळखले जाणारे पोलीस विश्वस्तांना अटक करण्यात कसे अपयशी ठरले, असा सवाल केला. घटनेबद्दल माहिती असल्यास लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्ह्याचा अहवाल देण्याच्या विश्वस्तांच्या कायदेशीर जबाबदारीवर न्यायालयाने भर दिला. कोर्टानेच कानउघडणी केल्यावर पोलिसांनी विश्वस्तांना तत्काळ अटक केली.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments