माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग (आबा) घोसाळे यांचा ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्ष प्रवेश

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते जयसिंग (आबा) घोसाळे यांनी आज उद्योग मंत्री तथा राज्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांच्या समवेत त्यांचे भाऊ अनिल घोसाळे, अमोल घोसाळे, विक्रांत घोसाळे, अमित घोसाळे, अक्षय भाटकर, अतुल घोसाळे, गजेंद्र नाईक, उदय नागवेकर, विश्वजित चौगुले, सचिन वायंगणकर, महेश डोंगरे, बाळकृष्ण घोसाळे, संदेश भाटकर, आकाश भाटकर, मंथन भाटकर, आरोही घोसाळे, मंदार घोसाळे, यांनी देखील आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी तालुका प्रमुख बाबू म्हाप, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक बंटी किर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Comments