*सरकारी बँकांत ३२ टक्के संचालकांच्या जागा नियुक्तीविना, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या सर्व २४ जागा दशकभरापासून रिक्त!!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*सरकारी बँकांत ३२ टक्के संचालकांच्या जागा नियुक्तीविना, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या सर्व २४ जागा दशकभरापासून रिक्त!!*

मुंबई :-- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये संचालकांची विविध ६० पदे अर्थात जवळपास ३२ टक्के जागा रिक्त असून, बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २४ जागा तर सर्वच १२ सरकारी बँकांनी दशकभरात भरलेल्या नाहीत. बँकांच्या कामकाजाला गंभीर जोखीम निर्माण करणाऱ्या या गैरप्रकाराची त्वरित दखल घेतली जावी, अशी मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून बँक कर्मचारी संघटनेने बुधवारी केली.*

कर्मचारी आणि अधिकारी यांना बँकांच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व मिळणे सोडाच, ठेवीदारांचे, कृषी, सहकार आणि कायदा या क्षेत्रांचे प्रतिनिधित्वदेखील संचालक मंडळात नाही. ही बाब या संबंधाने असलेल्या कायद्याचा दुरुपयोग सुचवते इतकेच नाही, तर बँकांच्या कारभाराच्या औचित्याबद्दलही प्रश्न निर्माण करणारी आहे, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) या देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या सर्वात जुन्या व मोठ्या संघटनेचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी सीतारामन यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

भारतीय राज्यघटनेतील 'अनुच्छेद ४३ अ'च्या तरतुदीनुसार कामगारांच्या व्यवस्थापनात सहभागाची तरतूद आहे. बँकिंग कंपनी अधिग्रहण आणि उपक्रम हस्तांतरण कायदादेखील कर्मचारी संचालकांच्या नियुक्तीची तरतूद करतो, याकडे वेंकटचलम यांनी अर्थमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

  असे असूनही देशातील १२ सरकारी बँकांमधील १८६ संचालकांच्या पदांपैकी ६० पदे, तीही क्षेत्रनिहाय प्रतिनिधित्व असणारी पदे रिक्त ठेवली गेली असल्याबद्दल त्यांनी निवेदनात खेद व्यक्त केला आहे.

चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, (बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक) तर बिगर कार्यकारी अध्यक्षाचे पददेखील रिक्त आणि नियुक्तीविना आहे. विशेषत: विद्यमान सरकारनेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) या एकत्रित पदाचे विभाजन करून निर्माण केलेले हे अधिकार पद आहे, ही बाबही त्यांनी लक्षात आणून दिली आहे.

कर्मचारी आणि अधिकारी संचालक ही अशी पदे आहेत जी बँकांच्या कारभारावर देखरेख व पाळत ठेवण्याचे काम करीत असतात.

   ती पदे रिक्त राखून, त्यांच्या अनुपस्थितीत बँकांतील व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी संचालक हे बेलगाम अधिकार वापरत आहेत. *– सी. एच. वेंकटचलम, महासचिव, एआयबीईए*


मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments