*मंडणगडातील आर. के. रेस्ट्रो हॉटेलला तेलाच्या भडक्यामुळे लागली आग*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*मंडणगडातील आर. के. रेस्ट्रो हॉटेलला तेलाच्या भडक्यामुळे लागली आग*
मंडणगड शहरातील आर. के. रेस्ट्रोमध्ये कढईतील तेलाचा आगीने भडका उडाल्याने सिलिंडरचा रेग्युलेटर जळून स्फोट होऊन काही प्रमाणात आग लागल्याची घटना बुधवार २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आसपासच्या दुकानदारांनी तत्काळ मदतकार्य केल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत झाली. दरम्यान, या दुर्घटनेत हॉटेलमधील एका कर्मचाऱ्यास दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
आर. के. रेस्ट्रो. हॉटेल हे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नेहमीच गजबजलेले असते. बुधवारी सायंकाळी हॉटेलमधील कर्मचारी किचनमध्ये काम करत असताना अचानक कढईतील तेलाने पेट घेतला, आगीच्या भडव्यामुळे सिलिंडरच्या पाईप व रेग्युलेटरने पेट घेतला. रेग्युलेटर उडाल्याने स्फोट झाल्याचा आवाज सर्वत्र झाल्याने आसपासच्या दुकानदारांनी तत्काळ आग विझवण्यासाठी मदतकार्य सुरु केले.
रहदारीच्या व गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या दुर्घटनेत थोडक्यात नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने सर्वानीच सुटकेचा निःश्वास सोडला. या दुर्घटनेत मदतकार्य करण्यास रुपेश साळुंखे, राहुल खांबे, साईराज सावंत, कौस्तुभ भिंगार्डे व आसपासच्या दुकानदार व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला. यावेळी एच. पी. गॅस एजन्सीचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी भेट देवून मदतकार्याची कार्यवाही सुरू केली.
दुर्घटनाग्रस्त आर. के. रेस्ट्रो. हॉटेल हे रहदारीच्या ठिकाणी व नगरपंचायत कार्यालयाच्या अगदी नजीक आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी शहरातील मुख्य चौकातील दुकानाला आग लागून हे दुकान पूर्णपणे खाक झाले होते. शहरात नगरपंचायत कार्यरत असून अग्निशमन यंत्रणा नसल्याने नगरपंचायतीच्या कारभाराबाबत सर्वानीच यावेळी प्रश्न उपस्थित केला.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा