*शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक,* *उमेदवार बदलणार?;**संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक,*
*उमेदवार बदलणार?;*
*संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल*
मुंबई --- विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. त्यात मविआतील ३ प्रमुख पक्ष काँग्रेस-शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ८५-८५-८५ अशा जागा लढवणार आहे.
२७० जागांवर तिन्ही पक्षात सहमती झाली असून उर्वरित १८ जागांबाबत मित्रपक्षांना सोडली जाईल. त्यांच्याशी उद्या सकाळपासून चर्चा होईल असं संजय राऊतांनी मविआच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
मात्र या पत्रकार परिषदेच्या काही मिनिटे आधी शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली, ती चुकून आल्याचं राऊतांनी म्हटलं.*
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना मुख्यालयाच्या यादीमध्ये काही दुरुस्त्या आहेत. ते कशाप्रकारे झालं, काय झालं, आमची प्रशासकीय चूक कशी काय होऊ शकली याबाबत आमचे अनिल देसाई आहेत ते या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहतात.
पण आम्ही आज बसणार आहोत. त्यावर काही नव्याने चर्चा होतील असं त्यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या पहिल्या यादीत मित्रपक्षांच्या जागांचाही समावेश आहे. त्यामुळे पहिल्या यादीतील काही उमेदवार बदलले जाऊ शकतात असे संकेत राऊतांनी दिले आहेत.*
तसेच २८८ जागांचा प्रश्न सुटला असं जेव्हा आम्ही सांगतोय, ते अत्यंत जबाबदारीने सांगतोय. १८ जागा मित्रपक्षाला दिल्या जातील.
त्यात आमच्यातील कुणाचा दावा असला तर त्यातून काही मार्ग काढला जाईल. आमची जी यादी चुकून आली आहे, त्यात काही शेकापच्या जागा आहेत. त्यावर शेकापची चर्चा सुरू आहे.
काही जागा राष्ट्रवादीकडे आहेत, त्या मित्रपक्षांशी संबंधित आहेत. काही काँग्रेसकडे एखादी दुसरी जागा आहे त्यावर चर्चा होईल असं संजय राऊतांनी म्हटलं.*
दरम्यान, प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका घेऊन पुढे जात असतो, महाविकास आघाडीत मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे.
समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, सीपीआय, आप या सर्वांना सामावून घेणारे आमचं जागावाटप पूर्ण झालं आहे.
तिन्ही पक्ष ८५-८५-८५ अशा २७० जागा लढवणार आहोत. उर्वरित ज्या जागा आहेत ते आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी आज सकाळपासून चर्चा होईल.
२८८ जागा महाविकास आघाडी ताकदीने लढून राज्यात सत्तेवर येईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.*
*पहिली यादी अंतिम नाही?*
*शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी पहिल्या यादीबाबत पत्रकारांनी विचारले असता ज्या ज्या जागांवर जे काही दुरुस्ती असतील त्या करून आज स्पष्ट होईल असं म्हटलं आहे.*
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा