*महाराष्ट्राच्या राजकारणात अखिलेश यादव यांची एन्ट्री; उद्या येणार राज्याच्या दौऱ्यावर*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*महाराष्ट्राच्या राजकारणात अखिलेश यादव यांची एन्ट्री; उद्या येणार राज्याच्या दौऱ्यावर*


राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्यानंतर तयारीला जोर आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीची तयारी जोरदार सुरु आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये छोटे पक्ष नाराज असल्याचे समोर आले आहे. इंडिया आघाडीमध्ये एकत्रित असलेल्या समाजवादी पक्षाला डावले जात असल्याचे समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता जोरदार चर्चा रंगल्या असून समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

लोकसभा निवडणूकीमध्ये इंडिया आघाडी म्हणून कॉंग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि समाजवादी पार्टी हे इतर पक्षांसोबत एकत्रितपणे लढले होते. यानंतर आता राज्यातील निवडणूकांमध्ये देखील एकत्रित लढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आली असून अजूनही समाजवादी पार्टीसोबत कोणतीही बोलणी झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष नाराज असल्याचे उघड झाले आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे नेते अबु आझमी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त देखील केली होती.

यावर बोलताना अबु आझमी म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये उदधव ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉंग्रेस यांचीच बैठक होते. विधानसभेच्या आधी कॉंग्रेसकडून जागा देखील जाहीर करण्यात येणार होत्या. त्या जागा जाहीर होण्यापूर्वी एकदा आमच्या पक्षाची चर्चा झाली पाहिजे. बैठक घेऊन आम्हाला किती जागा देणार किंवा देणार नाही, याची माहिती दिली पाहिजे. इंडिया आघाडीमध्ये आम्ही लोकसभेमध्ये एकत्रितपणे उत्तम लढत दिली. तशीच लढत विधानसभेमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला 12 जागा हव्या असून त्यांवर आम्ही निवडणून येणार असा आमचा दावा आहे. या संबंधित चर्चा करण्यासाठी आता समजावादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. समाजवादी पक्ष हा देशातील तिसऱ्या नंबरचा पक्ष असून त्यांचे म्हणणे मविआच्या नेत्यांना ऐकावे लागेल, असे मत अबु आझमी यांनी व्यक्त केले.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा केली आहे. जागावाटपच्या अंतिम टप्प्यामध्ये बोलणी आलेली असताना अखिलेश यादव हे महाराष्ट्रामध्ये येत आहे. अखिलेश म्हणाले की, उद्या महाराष्ट्रच्या दौऱ्यावर जाणार आहे. जागावाटपात आपल्या पक्षाला अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करेल. इंडिया आघाडीतून निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही काही जागांबाबत बोललो आहोत. आमचे दोन आमदार होते. आता आणखी जास्त जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे, अशा भावना अखिलेश यादव यांनी व्यक्त केल्या आहेत.


*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org