*सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना शासनाने काढू नये*


*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना शासनाने काढू नये*


 मनोज जरांगे यांच्या उपोषणाला बळी पडून मराठा समाजाच्या सगेसोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना शासनाने काढू नये, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी लांजाच्या तहसीलदार प्रियांका ढोले यांच्याकडे देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सगेसोयरे अधिसूचनेच्या मसुद्यावर लाखो हरकती नोंदवल्या गेल्या. त्या सगेसोयरे अधिसूचनेच्या विरोधातील आहेत. त्यावर अजूनही कृती अहवाल तयार झालेला नाही, त्यामुळे तो प्रसिद्ध करावा.

या अधिसूचनेतील सगेसोयऱ्यांची व्याख्या असंविधानिक, बेकायदेशीर आणि अनावश्यक असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विरोधात आहे, असे म्हटले आहे. सगेसोयरे अधिसूचनेच्या मसुद्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे.

शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम २०१२ यात सुधारणा करणारी अधिसूचना काढू नये अन्यथा कोकणातील कुणबी व अन्य ओबीसी राज्य सरकारला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हे निवेदन देताना कुणबी समाजोन्नती संघ शाखा लांजाचे अध्यक्ष अनिल कसबले, उपाध्यक्ष संदीप सावंत, उपाध्यक्ष यशवंत वाकडे, सचिव मनोज चंदूरकर, खजिनदार दिलीप तिखे, सहसचिव सचिन नरसले तसेच चंद्रकांत मणचेकर, लक्ष्मण मोर्ये, संजय पाष्टे, बी. टी. कांबळे, योगेश खावडकर, लीला घडशी, राजेंद्र पालये, सुनील खुलम, दीपक निवळे, दिलीप चौगुले, चंद्रकांत गोठणकर, वृणाली आम्रसकर, दत्ताराम वीर, तात्या मसणे, सचिन तांबे, अशोक मसणे, दिनेश मसणे, दिलीप जोशी, कल्पेश रांबाडे, विनायक पालये, संदेश माईल उपस्थित होते.


*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments