*दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका; गोडेतेल, रवा, मैद्यासह खोबऱ्याचे दर कडाडले*
*दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका; गोडेतेल, रवा, मैद्यासह खोबऱ्याचे दर कडाडले*
ऐन दिवाळीच्या तोंडावर गोडेतेल, रवा, मैदा, बेसन, पोहे, गूळ, खोबऱ्यासह डाळींच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. जीवनावश्यक साहित्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडले आहे.
दिवाळी सण साजरा करण्यासाठी सर्वचजण उत्सुक असतात. दिवाळी सणात नवीन कपडे, घरी आनंदाचे वातावरण आणि गोडधोड फराळ बनविला जातो. हा गोड फराळ खाण्यासाठी खवय्ये वर्षभर दिवाळीची वाट पाहत असतात. दिवाळीच्या पंधरा ते आठवडाभर आधीच फराळ बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू असते. मात्र, यावर्षी फराळ बनविणाऱ्या गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
दिवाळीत फराळ तयार करायचा की नाही, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. याला कारण म्हणजे ऐन सणासुदीच्या व दिवाळीच्या तोंडावर फराळ बनविण्यासाठी जे जिन्नस लागतात त्या गोडेतेल, रवा, मैदा, बेसन, पोहे, गूळ, खोबऱ्यासह डाळींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याची झळ सामान्य लोकांना बसत आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न गृहिणी व सामान्य लोकांसमोर आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून सर्वसामान्य महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांची मदत सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे महागाई वाढल्याने लाडक्या बहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली जात आहे. लाडकी बहीण योजना सुरू होण्यापूर्वी खाद्यतेलाचा 14 किलोचा एक डबा 1600 रुपयाला मिळत होता. मात्र, दिवाळी सणाला काही दिवस बाकी आहेत, तोच हा डबा तब्बल 2200 रुपयांवर पोहोचला आहे. हरभरा डाळ पूर्वी 70 रुपये किलो होती, ती आता 110 रुपयांना मिळत आहे. खोबरेही 120 रुपयांवरून तब्बल 230 रुपये किलो इतके महाग झाले आहे. रवा 35 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत पोहोचला असून, बेसन 80 रुपयांवरून 110 रुपयांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. ऐन सणासुदीच्या काळात गोडेतेल, रवा, मैदा यांच्या किमती वाढल्यामुळे गृहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे.
घरोघरी गृहिणींमध्ये फराळ तयार करण्याची लगबग दिसून येते. सध्याचे चित्र मात्र याउलट आहे. महागाईमुळे तेल, तूप, रवा, बेसन यांसह अन्य विविध कच्च्या मालाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कच्चा माल खरेदी करून फराळ तयार करण्यासाठी येणाऱ्या खचपिक्षा निम्म्या किमतीत तयार फराळ मिळत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाईमुळे फराळातील पदार्थांच्या वस्तूंचे दरही 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत.
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना स्वस्त धान्य दुकानांमध्ये मिळणारा आनंदाचा शिधा अद्यापपर्यंत आलेला नाही. सणासुदीला अवघ्या 100 रुपयांत तेल, साखर, रवा आणि डाळ असे चार जिन्नस गोरगरिबांना मिळतात. या पिशव्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापलेले असतात. यंदा आचारसंहितेच्या नावाखाली आनंदाचा शिधा येणार नसण्याची शक्यता स्वस्त धान्य दुकानदारांनी व्यक्त केली.
खाद्यतेलावर आयात शुल्क आकारल्यामुळे खाद्यतेलाच्या भावात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 105 ते 120 रुपये किलो असणारा खाद्यतेलाचा भाव 145 ते 155 वर पोहोचला आहे. रवा, मैद्यासह खोबरेही प्रचंड महागले आहे. त्यामुळे किराणामाल खरेदी करताना ग्राहक हात आखडता घेत आहेत.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा