गुहागरच्या निसर्गरम्य वातावरणात फुलला प्रेमाचा बहर "देना मला साथ"
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र प्रसिद्ध कवी गीतकार शशांक कोंडविलकर
यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि दिग्दर्शित केलेलं एक अफलातून युगुलगीत लवकरच
आपल्या प्लेलिस्ट मध्ये जागा घ्यायला येतंय,
"देना मला साथ" अशा भन्नाट नावाचं हे गीत गुहागर मधील निसर्गरम्य अशा वेळणेश्वर
गावात चित्रित केलं आहे
टी सिरीज या नामांकित कंपनीच्या लेबल खाली हे गीत आपण लवकरच पाहणार आहोत
गीतकार शशांक कोंडविलकर यांच्या या गीताला गणेश सुर्वे या आघाडीच्या
संगीतकारांनी संगीत दिले असून ते गायलं आहे प्रसिद्ध गायक केवल वळंज यांनी .
रीलस्टार ऋषभ तोडणकर आणि अभिनेत्री प्रतीक्षा कानसे यांची यात प्रमुख भूमिका असून
पंचक्रोशीतील स्थानिक कलाकार हि या गाण्यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत
छायाचित्रणाची जबाबदारी कोकणी कार्टी फेम अमित कुबडे तर नृत्यदिग्दर्शन
युट्युबर रुपेश राऊत आणि टीम यांनी सांभाळली आहे
निर्मिती प्रमुख ची जबाबदारी आय झेड कोकणातले सुपरस्टार मकरंद वैद्य आणि
मंगेश जाधव यांनी सांभाळली असून गाण्याची निर्मिती संगीतकार गणेश सुर्वे यांची आहे
लवकरच 'देना मला साथ' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा