मुंबई वर्सोवा विधानसभेसाठी रामदास संधे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षांतर्गत उमेदवारी अर्ज सादर केला
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालय टिळक भवन, दादर येथे महाराष्ट्र फिशरमन काँग्रेसच्या मागणीनुसार मच्छिमार नेते रामदास पांडुरंग संधे ( ऑल इंडिया फिशरमन काँग्रेस.वर्किंग प्रेसिडेंड ) यांचा आज कोळी समाजाच्या वतीने वर्सोवा विधानसभेसाठी पक्षांतर्गत उमेदवारी अर्ज भरण्यात आला. सदर उमेदवारी अर्ज भरण्यावेळी महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा तसेच कचरोजी भारसकर , नंदकुमार नगरे, मिलतन सोंडीया व तांडेल साहेब , मकु साहेब आणि मार्शल कोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment