*निवडणूक आयोगाचा शिंदे सरकारला दणका! 'योजनादूत' योजनेला स्थगिती!!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*निवडणूक आयोगाचा शिंदे सरकारला दणका! 'योजनादूत' योजनेला स्थगिती!!*
राज्य सरकारच्या विविध सरकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली 'मुख्यमंत्री योजनादूत' योजना निवडणुकीच्या काळात स्थगित करण्याचा आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने दिला आहे.*
या योजनेच्या माध्यमातून सरकारने ५० हजार तरुणांची सहा महिन्याच्या कालावधीसाठी 'योजनादूत' म्हणून नेमणूक केली होती.
यात सामील प्रत्येक तरुणाला दर महिन्याला १० हजार रुपये वेतन देण्यात येत होते. परंतु राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैशाने योजनांचा प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
या योजनेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नेमले असून ते भाजपचा प्रचार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे ही योजना तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत केली होती.
त्यासंबंधी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज, शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन लेखी तक्रार केली होती. त्याची दखल घेत ही योजना स्थगित करावी असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.
*काय होती योजनादूत योजना?*
घरोघरी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ सप्टेंबर रोजी योजनादूत योजना जाहीर केली होती.
मुख्यतः बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे, या उद्देश्याने ही योजना सुरू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. १८ ते ३५ वयोगटातूल पदवी पर्यंत शिक्षण झालेले महाराष्ट्रातील रहिवाशी असलेला कोणताही तरुण या योजनेत सामील होण्यासाठी पात्र ठरत होते.
योजनादूत योजनेत अर्ज करणाऱ्या पदवीधर तरुणाला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक होते. शिवाय त्याच्याजवळ स्वतःचा मोबाइ फोन असणे आवश्यक होते. योजनादूत योजनेत अर्ज करणाऱ्या तरुणाकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक होते. या योजनेत अर्ज भरण्याची मुदत १३ सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. या योजनेच्या माहितीसाठी राज्य सरकारने mahayojanadoot.org हे संकेतस्थळ तयार करण्यात आले होते.
*फॉर्म-७ चा गैरवापर केला जात असल्याचा आरोप*
लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात महाविकास आघाडीला जास्त मते पडली त्या मतदारसंघात साधारणपणे १० हजारावर मते कमी करण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
भाजपा युती विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाही म्हणून फॉर्म-७ चा गैरवापर केला जात आहे. म्हणून फॉर्म ७ घेणे बंद करा व पुन्हा असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्या. मतदार ओळखपत्रातही अनेक चुका आहेत.
मतदारांनीही आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करावी, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा