*डोर्लेत वादळी वाऱ्यासह पाऊस, भातशेती धोक्यात; शेतकरी हतबल*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*डोर्लेत वादळी वाऱ्यासह पाऊस, भातशेती धोक्यात; शेतकरी हतबल*
विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस व वादळी वाऱ्याचे अचानक आगमन झाल्याने भातशेतीसह अन्य पीके वाया जाण्याची भीती असल्याने ओला दुष्काळ पडण्याचे संकेत शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. परतीच्या पावसाने डोर्लेसह अन्य गावातील शेतकऱ्यांना चांगला फटका बसला आहे. गणपती उत्सवादरम्यान भातशेती कापण्यायोग्य तयार झाली होती. मात्र गणपती पासून पावसाने उघडीप घेतलेली नाही, पावसाने जराही उसंत न घेतल्याने शेतकऱ्यांना तयार झालेले भात कापायची संधी मिळाली नाही.
सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. सतत पाऊस पडत असल्याने उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. पावसामुळे पडलेल्या लोंबिना जागेवरच कोंब येण्याची भीती असून हातातोंडाशी आलेली भातशेती आपल्या घरात कशी येते याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. दररोज होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे पाऊस लवकर जाईल की नाही अशी चिन्हे दिसून येत आहेत.
भात कापणीच्या हंगामातच पावसाने एन्ट्री केल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. अतिवृष्टीतून वाचलेले भात पीक पदरात पडेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना पडली असून यंदा ओल्या दुष्काळाची चिन्हे दिसून येत असल्याने शेतकरी वर्गातून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. ओला दुष्काळ पडल्यास शेतकऱ्यांना त्यातून सावरण्यासाठी कृषी विभागाने त्वरित काहीतरी अंमलबजावणी करावी व शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा