*रिजनल टीचर ऑर्गनायझेशन दापोली यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
*रिजनल टीचर ऑर्गनायझेशन दापोली यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
*खेड दापोली* - रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. ही संस्था फक्त सात महिन्यांमध्ये नावारूपाला आली असून या संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्रातून 10900 सभासद आहेत. या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय काशीद सर तसेच त्यांच्या टीमच्या कल्पनेतून आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रा मधून 100 हून अधिक मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपला फॉर्म भरला होता यामध्ये 59 शिक्षक व मुख्याध्यापक यांची निवड करण्यात आली होती.
खेड येथील काळकाई देवी मंदिर हॉलमध्ये रविवार दिनांक 29 सप्टेंबर2024 रोजी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निवड झालेले मुख्याध्यापक व शिक्षक कार्यक्रमासाठी 59 शिक्षक उपस्थित राहिले होते. या सर्व शिक्षकांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून आणि अतिशय नियोजनबद्ध असा कार्यक्रम पाहून त्यांचे कुटुंबीय भारावून गेले.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी शिक्षक आणि शिक्षण पर्यावरण पर्यटन या विषयावर सविस्तर चर्चा केली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री वैभवजी खेडेकर साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तसेच श्री विजयजी बाईत साहेब गटशिक्षणाधिकारी खेड श्री विवेकजी इदाते पर्यटन व्यावसायिक महासंघ संघटक तसेच रिजनल टीचर ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय काशीद सर
श्री भरत पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री संजय खटके राष्ट्रीय कार्याध्यक्ष सौ प्रियांका काशीद राष्ट्रीय सल्लागार श्री आशिष देशमाने राष्ट्रीय क्रीडा प्रमुख श्री सचिन सपकाळ राष्ट्रीय शिक्षक प्रमुख श्री विशाल निकम राष्ट्रीय सचिव श्री विनायक सुर्वे राष्ट्रीय खजिनदार श्री सचिन बडे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष समन्वयक श्री प्रदीप सोनवणे महाराष्ट्र राज्य सल्लागार श्री दत्ता पाटील रत्नागिरी जिल्हा सर्वेक्षण विकास विभाग श्री बाळासाहेब नकाते अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कोकण विभाग तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक बांधव सभासद व त्यांचे कुटुंबीय संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित होते.
Join Group
*दैनिक फ्रेश न्युज दापोली*
https://chat.whatsapp.com/B9dBzvojV2K6BzRMMovIUm
Comments
Post a Comment