*केंद्र सरकारने 9 नेत्यांच्या सुरक्षेतून NSG कमांडो हटवले; CRPF कडे सोपवली जबाबदारी*
*दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी*
*केंद्र सरकारने 9 नेत्यांच्या सुरक्षेतून NSG कमांडो हटवले; CRPF कडे सोपवली जबाबदारी*
केंद्र सरकारने VIP सुरक्षेतून NSG कमांडो हटवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील महिन्यापर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह नऊ VIP जणांच्या सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे देण्यात येणार आहे. ज्या VIP व्यक्तींच्या सुरक्षेत एनएसजी कमांडो तैनात आहेत, त्यांच्या जागी आता सीआरपीएफ जवान तैनात केले जाणार आहेत.
*या नेत्यांच्या VIP लोकांच्या सुरक्षेत होणार बदल*
1- यूपी सीएम योगी आदित्यनाथ
2- मायावती
3- राजनाथ सिंह
4- लालकृष्ण आडवाणी
5- सर्बानंद सोनोवाल
6- रमन सिंह
7- गुलाम नबी आजाद
8- एन चंद्रबाबू नायडू
9- फारुख अब्दुल्ला
सीआरपीएकडे व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी सहा बटालिअन आहेत. आता यात सातव्या बटालिअनचा समावेश करण्यात आला आहे. नव्या बटालिअनकडे नऊ व्हिआयपींची जबादारी असणार आहे. या 9 पैकी 2 व्हीआयपींना सीआरपीएफकडून स्वीकारल्या जाणाऱ्या एडवांस सिक्योरिटी कॉन्टेक्ट प्रोटोकॉल लाभही मिळणार आहे. यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. याआधी CRPF कडून पाच व्हीआयपींना अशी एडवांस सिक्योरिटी पुरवली जात आहे. यात गृहमंत्री अमित शाह, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गांधी कुटुंबातील तीन काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.
➖➖➖
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी
फॉलो
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment