*आटपाडीत ओढ्याला 500 ₹ च्या नोटांचा पूर!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*आटपाडीत ओढ्याला 500 ₹ च्या नोटांचा पूर!*


▪️आटपाडी, सांगली : शहरातील शुक ओढ्यातून पाण्यासोबत चक्क पाचशेच्या नोटा वाहून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही माहिती कळताच नोटा घेण्यासाठी आठवडी बाजारात आलेल्या लोकांची झुंबड उडाली होती. हा प्रकार सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत सुरू होता.

▪️या नोटा कुणाच्या आहेत? याबद्दल कसलीही माहिती समोर आलेली नाही. पाण्यात साधारणपणे चार ते सहा लाख रुपये एवढी रक्कम वाहत आली असावी अशी चर्चा घटनास्थळी होती. याप्रकरणी आटपाडी पोलिसांत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

▪️आज सकाळची शाळा असल्याने गदिमा पार्कसमोरील विद्यार्थी शाळेला जाताना ओढ्यात पाचशे रुपयांच्या नोटा आढळून आल्या. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आज आटपाडीचा आठवडी बाजार असल्याने लोकांची गर्दी झाली होती. बाजारात आलेले तरुण ओढ्यात नोटा शोधण्यासाठी उतरले. दोन- चार तरुणांना पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्या त्यामुळे नोटा गोळा करण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने पाण्यात उतरले.

▪️अनेकांना दहा, वीसपासून पन्नास ते नव्वद हजारांपर्यंत रक्कम सापडली. हा सगळा प्रकार दुपारी बारापर्यंत सुरू होता. तीन प्लास्टिक पिशव्यांत या नोटा होत्या. यामध्ये जुन्या आणि नव्या नोटांचा समावेश होता. जुन्या नोटांमध्ये दोन हजार, एक हजार, पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश होता.

*नोटा कोणाच्या आणि किती?*

▪️नोटा सापडलेले ठिकाण छोट्या ओढ्याचे असून तेथे पाण्यातच घरातील कचरा टाकला जातो. तेथे महिलेने घराची स्वच्छता करताना कचरा टाकला असावा. त्याच्या सोबत घरात लपवून ठेवलेल्या जुन्या आणि नवीन नोटा कचरा म्हणून टाकला असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या