..'50 खोके एकदम ओके' ही घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने रद्द केला एफआयआर!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
..'50 खोके एकदम ओके' ही घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने रद्द केला एफआयआर!*
'पन्नास खोके एकदम ओके' अशा घोषणा देत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. सरकारने अपेक्षाभंग केल्यास उद्रेक तर होणारच असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.*
जळगावच्या धरणागाव येथील पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी ॲड. शरद माळी यांनी याचिका केली होती. न्या. विभा पंकणवाडी व न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवत ॲड. माळी यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला.
*प्रत्येक आंदोलन शांततेचा भंग करत नाही*
सामाजिक शांतता कायम ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले होते, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र प्रत्यके आंदोलन हे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी केलेले नसते, असे खडे बोल खंडपीठाने पोलिसांना सुनावले.
*काय आहे प्रकरण…*
गेल्या वर्षी मार्च महिन्यात आमदार सत्तार हे जळगाव जिह्याच्या दौऱयावर होते. त्यावेळी ॲड. माळी यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी (उद्वव बाळासाहेब ठाकरे) मंत्री सत्तार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कापूस व रिकामे खोके फेकले. '50 खोके एकदम ओके' अशा घोषणा दिल्या, असा ठपका ठेवत शिवसैनिकांविरोधात (उद्वव बाळासाहेब ठाकरे) गुन्हा नोंदवण्यात आला होता. नाहक त्रास देण्यासाठी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ती न्यायालयाने मान्य केली.
*आरोपात तथ्य नाही*
मंत्री सत्तार यांच्या ताफ्याला चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध केले, असा पोलिसांचा आरोप होता. मात्र आंदोलकांनी मंत्री सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवला व मंत्री यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले, असा तपशील नोंदवलेल्या गुन्ह्यात नाही.
त्यामुळे आंदोलकांवरील हा आरोप मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा