*2 लाखांची लाच घेणार्‍या कार्यकारी अभियंत्याला पोलीस कोठडी*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          

*2 लाखांची लाच घेणार्‍या कार्यकारी अभियंत्याला पोलीस कोठडी*  


 प्रलंबित असलेल्या ५ फाईलवर कार्यवाही करण्यासाठी तसेच पुणे मांजरी येथील नवीन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून ५ लाखांची मागणी करुन त्यापैकी २ लाख रुपये स्वीकारताना महावितरणचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत याला बुधवारी रंगेहाथ पकडले होते. न्यायालयाने अधिक तपासासाठी सावंत याला ३ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

याबाबत एका विद्युत ठेकेदाराने तक्रार केली होती. तक्रारदाराने ५ नवीन इमारतीसाठी इलेक्ट्रिक डी पी उभारुन सप्लाय चालू करुन देण्याचे काम घेतले होते. त्याच्या ५ फाईल भाऊसाहेब सावंत याच्याकडे प्रलंबित होत्या. सावंत याने तक्रारदार यांच्या मांजरी येथील नवीन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीजभार मंजूर करुन दिला होता. या ५ फाईल मंजुर करण्यासाठी सावंत याने ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सावंतला अटक केली होती.

भाऊसाहेब सावंत याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी न्यायालयात हजर केले. आरोपी हा महत्वाच्या पदावर काम करत आहे. याबाबत आणखी तपास करण्यासाठी आरोपीच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे. त्याने अशाच प्रकारे आणखी कोणा कोणाला लाच मागितली आहे का, आणखी कोणाची अडवणूक केली आहे का याची माहिती घ्यायची आहे. त्याला या कामात मदत करणारा कोणी साथीदार आहे का याचा शोध घ्यायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी मंजुर केली.
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org