*153 कोटी रुपयांच्या साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन*
*153 कोटी रुपयांच्या साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन*
बंदरांमुळे मच्छीमारांना ताकद 153 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले, हे माझे भाग्य आहे. साखरीनाटे, मिरकरवाडा, हर्णे, ही तीनही बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी आहेत, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
साखरीनाटे मत्स्यबंदराचे भुमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, सरंपच गुलजार ठाकूर, संरपच संदीप बानकर, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ, मेरीटाईम बोर्डचे कार्यकारी अभियंता मनिष मेतकर, राहूल पंडित, अमजद बोरकर, अश्फाक हाजू, दीपक नागले, राजू कुरूप, शफी वाडकर, तहसिलदार विकास गंबरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, 153 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या जेटीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले हे माझे भाग्य आहे. साखरी नाटे मिरकरवाडा बंदर, हर्णे बंदर ही तीन बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी बंदरे आहेत. हर्णे बंदर विकासासाठी 200 कोटी याआधी मंजूर करण्यात आले आहेत. आता साखरीनाटे बंदरासाठी 153 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटी रुपये देण्यात येतील. कर्नाटक राज्यामधील मल्पी बंदरापेक्षाही सर्व सोयी सुविधेने परिपूर्ण असे सुंदर बंदरे जिल्ह्यात होतील. पुढच्या आराखड्यामध्ये येथील जोड रस्त्यासाठी निधी मंजूर केला जाईल. मच्छीमार भगिनींना मच्छी सुकवण्यासाठी दोन्ही ओटे त्यांच्या मागणीनुसार मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
पालकमंत्री म्हणाले, विकास कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. गडकिल्ले संवर्धनासाठी 3 कोटी, रस्त्यांसाठी 4 कोटी, मुख्यमंत्री सडक योजनेतून 50 किलोमीटरचे रस्ते राजापुरात मंजूर केले आहेत. साखरीनाटे बाजारपेठ रस्ता काँक्रिटीकरण, राजापूर तालुक्यातील धरणासही पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जामदा धरण डागडुजीचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मच्छीमारांचा डिझेल कोटा बंद संदर्भात आपण स्वतः सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही आचारसंहितेपूर्वी तुमच्या खात्यात जमा होईल. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment