*बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांमध्ये CCTV बसवण्याचा सरकारी आदेश जारी*

दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी

*बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांमध्ये CCTV बसवण्याचा सरकारी आदेश जारी*   

          
बदलापूरमध्ये चिमुकलीवर शाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. त्यानंतर सरकारने शाळांसाठी मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. त्याचप्रमाणे आता राज्यातील आश्रमशाळांसाठीही मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली आहेत, असा शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. त्यामध्ये आश्रमशाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा आणि त्यासंबंधी कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

*काय आहे जीआर* 
शाळा, वसतिगृहे येथील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याबाबत यापूर्वी सूचित केले आहे. अद्याप CCTV  कॅमेरा बसविण्यात आला नसल्यास या शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील १५ दिवसांच्या कालावधीत बसविण्यात यावा. यासाठी शाळा व वसतिगृह प्रवेशद्वार, मैदान, वर्गखोल्या, स्वच्छतागृहाकडे जाणारी वाट, भोजनालय, पायऱ्या, कार्यालय, वाचनालय, प्रयोगशाळा, इ. ठिकाणी सर्व क्षेत्राचा आवाका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दृष्टीक्षेपात येईल अशा पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील असे नियोजन करावे. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.                              

CCTV कॅमेरा फुटेजची तपासणी आठवड्यातून किमान तीन वेळा करणे आवश्यक राहील. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे. त्यांच्या समवेत अधीक्षक/अधीक्षिका तसेच दोन शिक्षक (महिला व पुरुष) यांनी असणे बंधनकारक. याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रुम असावी. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत चौकशी करून प्रकल्प अधिकारी तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील.

अचानक एखादी बाब उद्भवल्यास तात्काळ संपर्क करता यावा तसेच मदत मागता यावी यासाठी वसतिगृहाच्या आणि शाळेच्या प्रत्येक मजल्यावर बेल असावी आणि ती चालु स्थितित असल्याची खात्री करुन घंटेचा आवाज अधिक्षिका व मुख्याध्यापक यांच्या कक्षापर्यंत जाईल अशा रितीने बसवुन घ्यावा.

शाळेतील शिक्षकेतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने ज्या नेमणुका केल्या जातात त्या बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी.


   
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments