*अवैध वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी पन्नास हजार दंड या अन्यायकारी निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार*
*अवैध वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी पन्नास हजार दंड या अन्यायकारी निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार*
*रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप*
*कोकणातील मंत्री- आमदारांबद्दल देखील व्यक्त होतेय तीव्र नाराजी*
▪️अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवैध वृक्ष तोडीला लगाम घालण्यासाठी पन्नास हजार रुपये इतक्या दंडाची कायद्यात तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मागणीबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यानिर्णया विरोधात उच्च न्यायालयात याचीका दाखल करणार असल्याचा भुमिका घेण्यात आली आहे.
▪️रत्नागिरी जिल्ह्यात ९९ टक्के इतके सर्वाधिक खासगी मालकी क्षेत्र आहे. केवळ एक टक्के इतके नाममात्र शासकीय वनक्षेत्र आहे. जिल्ह्यातील बहुतेक गोरगरीब शेतकरी आपल्या स्वमालकीच्या जमिनीतील झाडे तोडून आर्थिक गरजा भागवत असतो. तसेच आपल्या जमिनीतील साग, आंबा, फणस, शिवन या सारख्या झाडांपासून घरगुती बांधकामासाठी साहित्य आणि फर्निचर तयार केले जाते. लाकूड व्यापारावर जिल्ह्यातील असंख्य शेतकरी, कामगार यांची रोजी रोटी अवलंबून आहे. ही एका अर्थाने वनशेतीच आहे.
▪️जिल्ह्याचा विचार करता वनमंत्र्यांनी प्रस्तावित केलेली मागणी अवास्तव आणि अन्यायकारक असल्याची भावना यावेळी उपस्थित शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेने व्यक्त केली. याबाबत सर्व लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांची भेट घेऊन या कायदा शिथील करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली होती. यासाठी रितसर निवेदने, गाठी-भेटी घेऊन चर्चा देखील करण्यात आली. मात्र पालकमंत्री असो वा कोकणातील आमदार असोत त्यांनी याकडे गांभीर्याने नपाहता दुर्लक्ष केले आहे. याबाबत जिल्हा भरातुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आणि म्हणूनच सर्वसामान्य शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन संघटनेच्या वतीने याचिका दाखल करण्याची भुमिका रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी वर्गाने घेतली आहे. अवैध वृक्ष तोडीला आळा बसावा यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली पन्नास हजार रुपये इतक्या दंडाची तरतूद हि अन्याय कारक आणि सर्वसामान्य शेतकरी वर्गाला जाचक अट ठरणारी आहे. यात सर्वसामान्य मेटाकुटीला येणार आहे.
▪️शेतकर्याने ३००/५०० रु किंमतीचे झाड विनापरवाना तोडल्याबद्दल ५०००० दंड हा कोणत्या निकषावर त्याची घोषणा केली. या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे, शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे, नाहीतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आता आंदोलनाच्याही पवित्र्यात आहे. कारण कोकणला वाली कोण नसल्याचे चित्र असल्याचे त्यांनी बोलुन दाखवले
▪️दोन कॅबिनेट मंत्री आणि ६ आमदार या दोन जिल्हातील आहेत परंतु इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा या लोकप्रतिनिधी ना समजू नये यासारख दुर्भाग्य नाही, इथला शेतकरी आता न्यायासाठी लढायला तयार झाला आहे. आणि येणाऱ्या विधान सभेमध्ये याचे परिणार दिसून येतील असेही शेतकरी बांधवांनी सांगितले
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment