*नेत्यांच्या ‘लाडक्या मुलांना‘ लागले आमदारकीचे वेध**राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न, अनेक नावे चर्चेत*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*नेत्यांच्या ‘लाडक्या मुलांना‘ लागले आमदारकीचे वेध*

*राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न, अनेक नावे चर्चेत*
 

▪️आगामी विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची ‘लाडकी मुले‘ भाग्य आजमावण्याची शक्यता आहे. राजकारणातील घराणेशाहीवर नेहमीच चर्चा होत असली तरी राजकीय वारसदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. काहींनी आता तुम्ही थांबा अशी भूमिका घेतल्याची चर्चा रंगली आहे.

▪️विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्ष व नेते तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी तर मतदार संघ पिंजून काढण्यासाठी आधिच नियोजन केले आहे. सध्या काही इच्छुक  पायाला भिंगरी लावल्यासारखा मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवार मतदार संघात भेटीगाठी घेताना दिसत आहेत. 

▪️त्यात गणेशोत्सवात तर प्रत्येक ठिकाणी भेट तसेच मंडळांना आर्थिक मदत करताना दिसून आले. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-मंडणगड-खेड, गुहागर-चिपळूण, चिपळूण- संगमेश्वर, रत्नागिरी-संगमेश्वर, राजापूर-लांजा हे पाच विधानसभा मतदार संघ आहेत. सध्याची स्थिती बघितली तर योगेश कदम (शिंदे गट ), भास्कर जाधव (उबाठा गट), शेखर निकम (अजित पवार गट ), उदय सामंत (शिंदे गट), राजन साळवी (उबाठा गट) हे 5 आमदार आहेत. सध्या हे सर्वजण इच्छुक आहेत. परंतु आघाडी, युतीवर सर्व गणिते अवलंबून असणार आहेत.

▪️जिल्ह्यात राजकीय वारसा लाभलेले काही नेत्यांची मुलेसुद्धा इच्छुक आहेत. त्यापैकी पहिल्या क्रमांकावर दापोली-खेड- मंडणगडचे सध्याचे आमदार योगेश कदम हे इच्छुक आहेत. नेते रामदास कदम यांचे ते चिरंजीव आहेत. ते शिवसेनेकडून त्यावेळी संजय कदम यांच्या विरोधात निवडून आले होते. सध्या मात्र रामदास कदम हे शिंदे गटाचे नेते आहेत. यामुळे येत्या निवडणुकीत योगेश कदम हे शिंदे गटाकडूनच उभे राहणार आहेत. मात्र त्यांच्यासमोर माजी आमदार संजय कदम यांचे आव्हान असणार आहे, हे निश्चित आहे.

▪️गुहागर-चिपळूण मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव हेसुद्धा आपल्या मुलाला विक्रांत जाधव यांना राजकारणात वारसदार म्हणून पुढे आणताना दिसत आहेत. विक्रांत जाधव यांनी यापूर्वी जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे पद भूषवले आहे. येत्या निवडणुकीत त्यांच्या नावाचीसुद्धा चर्चा सुरु आहे. यामुळे गुहागर मतदार संघातून विक्रांत जाधव हे उबाठाचे उमेदवार असतील यामध्ये आश्चर्य मानायला नको. विक्रांत जाधव यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अनेक विकासकामे केली असल्यामुळे त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.

▪️माजी आमदार सुभाष बने हे सुद्धा आपल्या मुलाला राजकारणात आपला वारसदार म्हणून पुढे आणताना दिसत आहे. यांनीसुद्धा रोहन बने यांना पहिले जिल्हा परिषदला निवडून आणले आणि त्यांना अध्यक्ष पदाच्या खुर्चीत बसवले होते. सध्या रोहन बने यांचे नाव चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात उबाठाकडून चर्चेत आहे. यांनीसुद्धा जि.प. अध्यक्ष असताना अनेक विकासकामे केल्याने त्यांचेसुद्धा नाव जिल्ह्यात आहे. यामुळे सध्या या तीन राजकीय नेत्यांची मुले राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आली आहेत.

*नव्यांना संधी की, जुनेच कि वारसदार*

▪️रत्नागिरी जिल्ह्यात आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे वारे गतीने वाहू लागले असताना नवे चेहेरेही या आखाड्यात उतरण्यास इच्छुक दिसत आहेत. दुसर्‍या बाजूला मातब्बर राजकीय नेते तसेच त्यांच्या वारसदारांना आमदारकीचे वेध लागले आहेत. 

▪️या संघर्षपूर्ण लढतीत मतदार त्यांचा मार्ग मोकळा करणार की अडवणार याची उत्सुकता असणार आहे. जिल्ह्यात तशी फार घराणेशाही नसली तरी या निवडणुकीत लोकांच्या पसंतीस ती उतरणार का, याचे कुतुहल असणार आहे
 
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments