*चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत*
*चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत*
६५९ पैकी १०० प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणात ९५ लाख ४६ हजार ८७ रूपयाची तडजोडः २१ वादपूर्व प्रकरणात १३ लाख २७ हजार ३२३ इतक्या रकमेची वसुली
जिल्हा न्यायालय, चिपळूण येथे आज राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये ६५९ पैकी १०० प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणात एकूण रक्कम ९५ लाख ४६ हजार ८७ रूपये रकमेची तडजोड होवून प्रकरणे निकाली निघाली. तसेच २१ वादपूर्व प्रकरणात रक्कम १३ लाख २७ हजार ३२३ इतक्या रकमेची तडजोड होवून वसुली झाली.
या लोकअदालतीमध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय व जिल्हा न्यायालय येथील एकूण प्रलंबित प्रकरणे ६५९ व १ हजार ४९४ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये विविध बँका, पतसंस्था, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, इतर वित्तीय संस्था आणि नुकसान भरपाईचे अर्ज तसेच कौटूंबिक हिंसाचाराची व पोटगीची प्रकरणे सादर करण्यात आली होती. त्यासाठी न्यायाधीश व वकीलांचे तीन पॅनेल कार्यरत होते.
लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, पी. आर. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश व .एम.आर. काळे, सह दिवाणी न्यायाधीश, पॅनल विधीज्ञ अॕड. एन.जी.लाड, अॕड. श्रीमती नयना पवार, अॕड.आर.व्ही. बापट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या लोकअदालतीमध्ये ६५९ पैकी १०० प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणात एकूण रक्कम ९५ लाख ४६ हजार ८७ रूपये रकमेची तडजोड होवून प्रकरणे निकाली निघाली. तसेच २१ वादपूर्व प्रकरणात रक्कम १३ लाख २७ हजार ३२३ इतक्या रकमेची तडजोड होवून वसुली झाली. यामुळे पक्षकारांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय टळला.
चिपळूण शहरात रविवारी दिवसभरात प्रचंड पाऊस असून, देखील पक्षकार, वकील, पोलीस, पतसंस्था विविध बँकांचे प्रतिनिधी, महा. राज्य वीज वितरण कंपनी यांचे अधिकारी, कोकण रेल्वेचे पोलिस कर्मचारी हे त्यांची प्रकरणे लोकअदालतीमध्ये तडजोड करणेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पॅनलवरील न्यायाधीश व पॅनल विधिज्ञ यांनी प्रकरण तडजोड होण्याकामी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
लोकअदालतीमध्ये अनेक वर्षांची जुनी प्रलंबित प्रकरणे, ज्येष्ठ नागरिकांची प्रकरणे, कौटूंबिक वादाची प्रकरणे, अनेक जूने प्रलंबित दावे, अपिल, मोटार अपघात नुकसान भरपाई दावे, रेल्वेची प्रकरणे, बँकांची वसुली प्रकरणे व वादपूर्व प्रकरणे यांचा मोठ्या प्रमाणात तडजोडीने निपटारा करण्यात आला. या लोकअदालतीकरिता ज्येष्ठ विधीज्ञ व्ही.व्ही. शिगवण, एस.डी. तावडे, व्ही.एन. वाडकर, ओ. के. चिकटे, अजय कांबळी, सरकारी वकील, रेल्वे सुरक्षा बलचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी उपस्थित राहून तालुका विधी सेवा समिती चिपळूण यांना सहकार्य केले. अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश चिपळूण डॉ. अनिता नेवसे यांनी सर्वांचे आभार मानले.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा