गणेश चतुर्थीच्या दिवशी करा हे काम, विद्यार्थ्यांना मिळेल अभ्यासात यश!!!!!!!!!!

 गणपती बाप्पाला बुद्धिदाता असेही म्हटले आहे. त्यामुळे शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गणपतीची पूजा करावी. चला तर मग जाणून घेऊया गणेश चतुर्थीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी खास उपाय.



  1. शनिवारी गणेश चतुर्थी असून, गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच उत्सुक आहे. लहान मुलांना गणपती बाप्पाची जास्त ओढ असते. गणपती बाप्पाला बुद्धिदाता असेही म्हटले जाते. ज्ञान आणि शिक्षणासाठी ही गणपतीची पूजा केली जाते. विद्यार्थ्यांसाठी गणेश चतुर्थी अत्यंत महत्वाची आहे कारण हा दिवस त्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक वाढीसाठी अनुकूल मानला जातो. या दिवशी केलेल्या काही खास उपायांमुळे विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान आणि बुद्धिमत्ता प्राप्त होण्यास मदत होते.
  2. गणेश चतुर्थीला विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावेत. यानंतर गणेशमूर्ती स्थापन झाल्यावर तुपाचा दिवा लावावा. गणपतीसमोर बसून ॐ गम गणपतये नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. बुद्धी तेज होण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो.
  3. गणेश चतुर्थीला २१ दुर्वा गणपतीला अर्पण करावेत. असे मानले जाते की, दुर्वा भगवान गणेशाला प्रिय आहे आणि यामुळे बाप्पा प्रसन्न होईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी यश आणि सामर्थ्य देईल.
  4. भगवान विनायकाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक आहे. या दिवशी विद्यार्थ्यांनी गणपतीला मोदक अर्पण करावे आणि नंतर प्रसाद म्हणून स्वत: ग्रहण करावे. असे मानले जाते की, मोदक अर्पण केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते.
  5. गणेश चतुर्थीला विद्यार्थ्यांनी गणेश अथर्वशीर्षाचे पठण करावे. हे अत्यंत पवित्र आणि लाभदायक मानले जाते. यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढेल आणि त्यांना अभ्यासात चांगले गुण मिळतील, असे सांगितले जाते.
  6. गणपतीला लाल कुंकू खूप आवडते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीला कुंकू लावून त्याची पूजा करावी.
  7. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी गणपतीचे ध्यान करावे. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल. अवघड गोष्टी त्यांना सहज समजतील. गणेश चतुर्थीच्या दिवशी ही प्रथा सुरू करणे अत्यंत फायदेशीर ठरते, असे मानले जाते.
    गणपती बाप्पा मोरया

Comments