*‘मला न विचारता नियुक्ती का केली'; किरीट सोमय्या यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी नाकारली*
*‘मला न विचारता नियुक्ती का केली'; किरीट सोमय्या यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी नाकारली*
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर किरीट सोमय्या हे संतापले असून ‘मला न विचारता नियुक्ती का केली,’ असे पत्र लिहित त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी नाकारली आहे.
भाजपच्या या व्यवस्थापन समितीमध्ये रावसाहेब दानवे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपच्या या घोषणेमुळे सोमय्या कमालीचे नाराज झाले असून रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिलं आहे. ‘आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी,’ असे त्यांनी रावसाहेब दानवेंना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे.
पत्रामधून केली विनंती
‘मी विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतोय आणि करत राहणार आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण आणि प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये,’ असं म्हणत सोमय्यांनी विनंती सुद्धा केली आहे.
विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आमदार श्रीकांत भारतीय यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले.
याशिवाय पक्षाने विविध समित्यांचे प्रमुख नेमले आहेत. त्यानुसार जाहीरनामा समितीप्रमुख म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विशेष संपर्कप्रमुख म्हणून उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक संपर्कप्रमुख म्हणून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्कप्रमुख म्हणून राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, कृषी क्षेत्र संपर्कप्रमुख म्हणून अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्कप्रमुख म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्कप्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रचार यंत्रणाप्रमुख म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्कप्रमुख म्हणून विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, माध्यमप्रमुख म्हणून आमदार अतुल भातखळकर, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्कप्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्कप्रमुख म्हणून माजी आमदार भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्कप्रमुख म्हणून आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, सोशल मीडियाप्रमुख म्हणून आमदार निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून माजी खासदार किरीट सोमय्या यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दानवे यांनी दिली.
दरम्यान, व्यवस्थापन समितीवर विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment